प्रो कबड्डीतील १० व्या हंगामातील ४५ व्या सामन्यात पटना पायरेट्स आणि हरियाणा स्टीलर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पटना पायरेट्सने दमदार खेळ करत हरियाणा स्टीलर्स वर एकतर्फी विजय मिळवला. या विजयाचा पटना पायरेट्सला गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. पटनाचा संघ २२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर हरियाणाचा संघ चौथ्या स्थानी कायम आहे.
पटना पायरेट्सकडून मंजीत दहियाने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना कृष्णाने हाय फाय पूर्ण करत ५ गुणांची कमाई केली. हरीयाणा स्टीलर्सकडून विनयने सर्वाधिक १२ गुणांची कमाई केली. तर बचाव करताना राहुल सेतपालने ५ गुणांची कमाई केली.
पहिल्या हाल्फनंतर पटनाचा संघ १८-१५ ने आघाडीवर होता. हरीयाणाचा संघ यादरम्यान ऑलआऊट होण्याच्या वाटेवर होता. मात्र सचिन तंवरने सुपर रेड मारत आपल्या संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवलं. त्यानंतर हरीयाणाचा संघ मजबूत स्थितीत पोहोचला. इथून पटनाने दबाव टाकायला सुरुवात केली. १६ व्या मिनिटाला हरीयाणाचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. (Kabaddi News In Marathi)
दुसऱ्या हाल्फमध्ये पटना पायरेट्सने दमदार सुरुवात करत हरीयाणाला पुन्हा एकदा ऑलआऊट केलं. यासह पटना पायरेट्सने ९ गुणांची आघाडी घेतली. त्यामुळे हरीयाणाचा संघ पूर्णपणे दबावात होता. हरीयाणाचे चढाईपटू आणि बचावपटू या सामन्यात संघर्ष करताना दिसून आले.
हरीयाणासाठी विनयने आपलं सुपर १० पूर्ण केलं. तर राहुलने हाय फाय पूर्ण केलं. मात्र ही कामगिरी हरीयाणाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी नव्हती. शेवटी पटना पाटरेट्सने बाजी मारली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.