Pawan-Sehrawat
Pawan-Sehrawattwitter

Pro Kabaddi 2023: पवन सेहरावतचा PKL स्पर्धेत मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरला पाचवा खेळाडू

Pawan Sehrawat Record In PKL: पटनाने हा सामना जिंकला असला तरी तेलगू टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे
Published on

Pawan Sehrawat Record In Pro Kabaddi League:

प्रो कबड्डी लीग २०२३ स्पर्धेत पटना पायरेट्स संघाने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. तेलगू टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पटना पायरेट्स संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. पटना पायरेट्स संघाने या सामन्यात ५०-२८ च्या फरकाने विजय मिळवला आहे.

पटनाने हा सामना जिंकला असला तरी तेलगू टायटन्सचा कर्णधार पवन सेहरावतच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने १००० रेड पॉइंट्स पूर्ण केले आहेत. हा कारनामा त्याने १०७ सामन्यांमध्ये करून दाखवला आहे. असा कारनामा करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. (Pawan Sehrawat Record)

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पवन सेहरावतच्या आधी चार खेळाडूंनी हा कारनामा केला आहे. ज्यात प्रदीप नरवाल, मनिंदर सिंग, राहुल चौधरी आणि दीपक हुड्डा यांचा समावेश आहे. आता पवन पाचवा खेळाडू ठरला आहे. पवनने सामन्यातील सुरुवातीच्या पाच मिनिटात हा कारनामा केला आहे.

तर दुसऱ्या सामन्यात युपी योद्धा संघाने हरियाणा स्टिलर्स संघावर ५७-३७ ने विजय मिळवला आहे. सुरेंदर आणि प्रदीपने आपलं सुपर १० पूर्ण केलं. तर सुमित आणि नितेशने हाय फाय पूर्ण केलं. (Latest sports updates)

प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू..

पवन सेहरावत हा प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेच्या १० व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात पवन सेहरावतवर सर्वात मोठी लागली. या हंगामात तेलुगू टायटन्सने २ कोटी ६० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिलं आहे.

Pawan-Sehrawat
IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून प्रमुख गोलंदाज बाहेर होणार? वाचा कारण

यापूर्वी झालेल्या लिलवात त्याला तमिल थलाइवाजने २ कोटी २६ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. दरम्यान या हंगामातही तो सर्वात मोठी बोली लागलेला खेळाडू ठरला होता.

Pawan-Sehrawat
IND vs AUS: ऋतुराजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com