भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत. (Ruturaj Gaikwad)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मार्टीन गप्टीलच्या नावे होता. आता ऋतुराजने गप्टीललाही मागे सोडलं आहे. गप्टीलसह ऋतुराजने विराट कोहली आणि डेवोन कॉनव्हे यांनाही मागे सोडलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ऋतुराज गायकवाड -२२३ धावा
मार्टिन गप्टील - २१८ धावा
विराट कोहली - १९९ धावा
डेवोन कॉनव्हे - १९२ धावा (Latest sports updates)
टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४००० धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज..
याच सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ऋतुराज गायकवाड हा सर्व टी -२० फॉरमॅटमध्ये मिळून सर्वात जलद ४००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत एकूण १२२ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४०३५ धावा केल्या आहेत. नाबाद १२३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.