team-india
team-indiasaam tv news

IND vs SA: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा;बावूमा नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

South Africa Squad: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या वनडे,टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा केली आहे.
Published on

South Africa Squad For Series Against India:

ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-३० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

या मालिकांसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत संघाचं नेतृत्व करणाऱ्या टेम्बा बावूमाला वनडे आणि टी -२० संघात स्थान देण्यात आलेलं नाही. एडेन मार्करमची वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेतून टेम्बा बावूमा आणि कगिसो रबाडा यांना वगळण्यात आलं आहे. हे दोघेही थेट कसोटी मालिकेत कमबॅक करताना दिसून येणार आहे.

टेम्बा बावूमाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. तर बावूमाच्या अनुपस्थितीत एडेन मार्करम संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. (Latest sports updates)

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ: (South Africa Test Squad)

टेम्बा बावूमा (कर्णधार),डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेलार्ड कोएट्जी, टी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को यान्सेन, लुंगी एन्गिडी, के पीटरसन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर,कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरिन.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ: (South Africa ODI Squad)

एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, रीझा हेंड्रिक्स, हेन्रीच क्लासेन,वियान मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेविड मिलर, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, काइल वेरिन आणि लिझाद विलियम्स.

team-india
IND vs AUS: नेमकं चुकलं तरी कुठं? विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दारुण पराभवानंतर मॅथ्यू वेडने सांगितलं कारण

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ: (South Africa ODI Squad)

एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीट्जके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएट्जी (पहिला आणि दुसरा सामना ), डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन (पहिला आणि दुसरा सामना), लुंगी एन्गिडी (पहिला आणि दुसरा सामना), अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विलियम्स.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com