मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही दिग्गज फलंदाज आहेत. दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. कोणालाही विचारलं की,भारतीय संघातील तुमचा आवडता फलंदाज कोण? तर क्रिकेट फॅन्स या दोघांपैकी एकाचं नाव घेणारच. दरम्यान पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाला हा प्रश्न विचारला असता त्याने विराट-सचिनचं नाव न घेता दुसऱ्याच खेळाडूचं नाव घेतलं आहे.
कोण आहे भारताचा ग्रेटेस्ट फलंदाज?
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खानला (Junaid Khan) प्रश्न विचारण्यात आला होता की, भारतीय संघातील ग्रेटेस्ट फलंदाज कोण?या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने विराट किंवा सचिन तेंडूलकरचं नाव घेणं टाळलंय. त्याच्या मते रोहित शर्मा हा भारतीय संघातील ग्रेटेस्ट फलंदाज आहे.
रोहित शर्माबद्दल बोलताना काय म्हणाला?
नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये जुनैदला विराट आणि सचिनपैकी ग्रेटेस्ट फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने रोहित शर्माचं नाव घेतलं आणि म्हणाला की,' मी रोहितचं नाव घेईल. त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. विराट एक महान खेळाडू आहे. सचिननेही आपला काळ गाजवला. त्याने १०० पेक्षा अधिक शतकं झळकावली आहेत. रोहितने २६४ धावांची आक्रमक खेळी केली होती. या खेळीमुळे त्याला हिटमॅन म्हणतात. त्याच्या नावे अनेक दुहेरी शतकांची नोंद आहे. असे खेळाडू खूप कमी आहेत. त्याने सर्वाधिक षटकारही मारले आहेत. त्यामुळे मी रोहितचं नाव घेईन.' (Latest sports updates)
वर्ल्डकपमध्ये रोहितचा दमदार खेळ..
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रोहित शर्माने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी होता. त्याने ११ सामन्यांमध्ये १२५.९४ च्या स्ट्राईक रेटने ५९७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.