Ind vs Aus 5th T2OI: कांगारुंना धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज! बंगळुरुत कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

India vs Australia Head To Head Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संंघ पाचवा टी-२० सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहे. कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?
india vs australia
india vs australia saam tv news

Ind vs Aus 5th T20 Record:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील अखेरचा टी-२० सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता.

तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रलियाने दमदार कमबॅक केला होता. शेवटी चौथ्या सामन्यात २० धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली. हा सामना जिंकून भारतीय संघ ४-१ ने मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

एम चिन्नास्वामीच्या मैदानावर असा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड..

भारतीय संघाने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामीच्या मैदानावर ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १ सामन्याचा निकाल लागु शकला नव्हता. तसेच ऑस्ट्रेलियाचा या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर ऑस्ट्रेलियाने २ सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. (Latest sports updates)

india vs australia
Ind vs Aus 5th T20 Playing 11: अखेरच्या टी-२० सामन्यात टीम इंडियात बदल निश्चित! रिंकू सिंगच्या जागी या खेळाडूला मिळणार स्थान

या मैदानावर असा राहिलाय भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यांचा रेकॉर्ड..

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ या मैदानावर एक सामना खेळण्यासाठी आमने सामने आले आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी बाद १९४ धावा केल्या होत्या.

पिच रिपोर्ट..

बंगळुरुची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी स्वर्ग आहे. या मैदानावर आयपीएल स्पर्धेतील अनेक सामने खेळवले गेले आहेत. या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या सामन्यातही हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो . ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. मात्र छोटी बाऊंड्री असल्याने फटका फसला तरी चेंडू बांऊड्री लाईनच्या बाहेर जातो.

india vs australia
IND vs AUS 5th T20I weather update: भारत की ऑस्ट्रेलिया? बंगळुरुत कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टी ते हवामानापर्यंत सर्व माहिती

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रिंकू सिंग/शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com