Team India Most Win Record T20 : टीम इंडियाची दमदार कामगिरी, टी २० मध्ये मोठा रेकॉर्ड; पाकिस्तानला पछाडलं!

India surpass Pakistan after wins t20 series against Australia : वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला टी २० मालिकेत भारतानं मोठा दणका दिला.
Team India Wins T20 Series Against Australia
Team India Wins T20 Series Against AustraliaSAAM TV
Published On

Team India Wins T20 Series Against Australia :

वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला टी २० मालिकेत भारतानं मोठा दणका दिला. पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जिंकून भारतानं ही मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासह भारतानं पाकिस्तानला पछाडलं असून, टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी- ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २० धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने या मालिकेत ३-१ अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं १७४ धावा केल्या. १७५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी १५४ धावांवरच रोखले आणि हा सामना २० धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासह भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Latest Marathi News)

Team India Wins T20 Series Against Australia
IND vs AUS: 'सूर्य'कुमारच्या यंगीस्थानची कमाल; टीम इंडियाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला केलं पराभूत, मालिकाही जिंकली

भारत सर्वाधिक टी २० सामने जिंकणारा संघ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारताचा हा १३६ वा विजय आहे. भारत २००६ मध्ये पहिला टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आजपर्यंत भारत २१३ टी २० सामने खेळला आहे. ६७ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर तीन सामने अनिर्णित राहिले. भारताच्या विजयाची टक्केवारी ६३.८४ आहे.

भारतीय संघाच्या आधी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. २२६ सामन्यांत १३५ सामने जिंकले आहेत. तर टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वात सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड आहे. ते २०० सामने खेळले असून, १०२ सामन्यांत विजय मिळवला आहे.

Team India Wins T20 Series Against Australia
Under -19 Cricket Team: डोंबिवलीच्या मोठी देसाई गावच्या सुपुत्राची टीम इंडियात एन्ट्री! प्रेम देवकरची एशिया कपसाठी निवड

ऑस्ट्रेलिया याबाबतीत चौथ्या स्थानी आहे. १८१ सामन्यांत ९५ विजय, दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानी असून, १७१ सामन्यांत ९५ सामन्यांत विजय मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियाला रोखलं...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्यात मागील तीन सामन्यांच्या तुलनेत कमी धावसंख्या होती. भारताने यशस्वी जयस्वाल (३७ धावा) आणि ऋतुराज गायकवाड (३२ धावा) यांच्या बहारदार खेळीनंतर रिंकू सिंग याने २९ चेंडूंत चोपलेल्या ४६ धावा, जितेश शर्माच्या १९ चेंडूंत ३५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर १७४ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात दमदार झाली. ट्रेविस हेडने वेगवान खेळी केली. त्याने १६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. मात्र, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेलनं त्यांना रोखलं. अक्षरने १६ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. तर बिश्नोईने १७ धावा देत एक गडी बाद केला. या मालिकाविजयासह सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून पहिलीच मालिका जिंकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com