एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. या दोन्ही देशाच्या क्रिकेट सामन्याची मोठी क्रेझ असते. भारत आणि पाकिस्तानच्या संघातील सामन्याची तिकिटे महाग जरी असली तरी प्रेक्षक हा सामना पाहतात. वर्ल्डकपमधील दोन्ही संघामधील सामन्याचा थरार दोन्ही देशातील लोकांनी अनुभवला.(Latest News)
आता परत एकदा दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. ज्युनियर अंडर-१९ च्या आशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेत नव्या दमाचे खेळाडू एकमेकांसमोर येणार आहेत. टीम इंडियाचा ज्युनियर अंडर-१९ संघ ८ डिसेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान आशिया कप खेळला जाणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा करताना संपूर्ण वेळापत्रकही शेअर केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कधी होणार भारत आणि पाकिस्तानचा सामना?
या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, यूएई, जपान, श्रीलंका आणि बांगलादेश हे देशही सहभागी होणार आहेत. भारताचा पहिला सामना ८ डिसेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १० डिसेंबरला होणार आहे.
कसे होतील सामने
या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठ संघाचे चार- चार असे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन सामने खेळले जाणार आहेत. यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने १५ डिसेंबरला होतील, त्यानंतर अंतिम सामना १७ डिसेंबरला होतील. दरम्यान अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व पंजाबचा उदय सहारन करणार आहे. यामध्ये नाशिकचा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी आणि बीडचा सचिन धस यांनाही संधी देण्यात आलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.