वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. २३ नोव्हेंबर पासून ते ३ डिसेंबरपर्यंत या सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.
या मालिकेसाठी रोहित शर्मासह संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया संघाची जबाबदारी मॅथ्यू वेडकडे सोपवण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना आज विशाखापट्टनमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना फ्री मध्ये कुठे पाहता येईल,जाणून घ्या.
सुर्या- ऋतुराजच्या हाती नेतृत्वाची जबाबदारी...
रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर सुरुवातीच्या ३ सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शेवटच्या २ सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना दिसून येणार आहे. तर वर्ल्डकप संघाचा भाग असलेल्या ईशान किशनलाही या संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)
इथे पाहू शकता फ्री...
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे होते. तर लाईव्हा स्ट्रिमिंगचे हक्क डिज्नी प्लस हॉटस्टारकडे होते. आता भारत - ऑस्ट्रेलिया मालिका देखील फ्रीमध्ये पाहता येणार आहे. ही मालिका, हॉटस्टारवर नव्हे तर जियो सिनेमा या अॅपवर पाहता येणार आहे.
तर मोबाईल युजर्स देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. तर टीव्हीवर हा सामना स्पोर्ट्स १८ वर पाहता येणार आहे.
या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती..
केव्हा होणार भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना २३ नोव्हेंबर रोजी खेळवला होणार आहे.
कुठे होणार भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीएवीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टनम येथे खेळवला जाणार आहे.
किती वाजता सुरु होईल सामना?
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता केलं जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.