Rohit Sharma News: हिटमॅन टी-२० क्रिकेटला ठोकणार रामराम? रोहितबाबत BCCI काय निर्णय घेणार?

BCCI On Rohit Sharma: रोहित शर्माबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv news
Published On

Rohit Sharma News:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला. या स्पर्धेतील सलग १० सामने जिंकून भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

ही स्पर्धा गमावल्यानंतर रोहित मर्यादित षटकांच्या क्रिकेटचं कर्णधारपद सोडू शकतो. माध्यमातील वृत्तानुसार निवडकर्ते अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा होणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने निवड समितीला आधीच सांगून ठेवलं आहे की, त्याला टी -२० फॉरमॅटपासून दूर ठेवावं. रोहितने असंही स्पष्ट केलं आहे की जरी टी-२० संघात त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही, तर त्याला कुठलाही आक्षेप नसेल. भारतीय संघाचं पुढील लक्ष टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर असणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने बीसीसीआयने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंना विश्रांती दिली जात आहे. (Rohit Sharma T20I Cricket)

रोहित शर्मा टी -२० फॉरमॅट खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. तर रोहित वनडे फॉरमॅट खेळणं सुरू ठेवणार का? या मुद्द्यावर देखील चर्चा केली जाऊ शकते. जर त्याने वनडे क्रिकेटही न खेळण्याचा निर्णय घेतला तर तो केवळ कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करताना दिसून येईल. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. (Latest sports updates)

rohit sharma
Team India News: वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये! रोहितची भेट घेत या महत्वाच्या मुद्द्यांवर करणार चर्चा

सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत असंही म्हटलं आहे की, ' आता असं वाटतंय की रोहित शर्मा २०२५ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर नक्ष केंद्रित करताना दिसून येईल. भारतीय संघ कसोटी क्रिकेटसाठी नवा करणाऱ्या तयार करण्याच्या विचारात असणार आहे. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे निवडकर्ते आता नवीन पर्याय शोधण्याच्या विचारात असणार आहेत.' (Rohit sharma news)

rohit sharma
David Warner Tweet: मला माफ करा.. वर्ल्डकप जिंकल्यानंतर वॉर्नरने भारतीय फॅन्सची मागितली माफी; काय आहे कारण?

कर्णधार म्हणून रोहित शर्माला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी त्याने भारतीय संघाला आशिया कप जिंकून दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आता वर्ल्डकप स्पर्धा गमावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com