David Warner Tweet: मला माफ करा.. वर्ल्डकप जिंकल्यानंतर वॉर्नरने भारतीय फॅन्सची मागितली माफी; काय आहे कारण?

David Warner Apologies: काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या.
david warner
david warnersaam tv news
Published On

David Warner Apologies Indian Cricket Fan:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत सहाव्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर कब्जा केला.

वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियातील खेळाडूंचे फोटो जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. मिचेल मार्शचा ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो चर्चेत आल्यानंतर आता डेव्हिड वॉर्नरने केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्याने ट्वीट करत भारतीयांची माफी मागितली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

या कारणामुळे मागितली माफी..

भारतीय संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर क्रिकेट फॅन्स सक्रिय झाले आहेत. भारतीय संघाचा फायनलमध्ये पराभव झाला असला तरीदेखील संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने दमदार खेळ केला.

त्यामुळे काही फॅन्स भारतीय संघाचं कौतुक करुन धीर देताना दिसून येत आहेत. तर काही क्रिकेट फॅन्स संघातील खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवरुन टीका करताना दिसून येत आहेत. एका क्रिकेट फॅनने वर्ल्डकपविजेत्या संघातील खेळाडू डेव्हिड वॉर्नरला टॅग करत लिहीलं की, 'वॉर्नर,तू कोट्यवधी भारतीयांची मने तोडली आहेस.' (Latest sports updates)

david warner
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी

या पोस्टवर वॉर्नरने उत्तर देत लिहीलं की, ' मला माफ करा.. , हा खरंच खूप चांगला सामना होता आणि वातावरणही अविश्वसनीय होते. भारताने खरोखर चांगला इव्हेन्ट आयोजित केला होता. यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.'

या ट्वीटवर एका भारतीय फॅनने देखील मनं जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहीलं की, 'तू माफी मागू नकोस, तू सुद्धा वर्ल्डकप तुझ्या देशासाठी जिंकला आहेस.' हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत अशी राहिलीये डेव्हिड वॉर्नरची कामगिरी..

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वॉर्नरला मोठी खेळी करता आली नसली तरी या स्पर्धेत त्याची बॅट जोरदार तळपली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या स्थानी आहे.

त्याची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी ११ सामन्यांमध्ये ४८.६३ च्या सरासरीने ५३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.

david warner
World Cup 2023 IND vs AUS Final: टीम इंडीयाच्या पराभवानंतर मराठी सेलिब्रिटी झाले नाराज; अमेय वाघ ते सई आणि जितेंद्र जोशीची इन्स्टा पोस्ट चर्चेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com