Team India Playing XI: वर्ल्डकप फायनलसाठी रोहितचा 'मास्टरप्लान'; कांगारूंना चितपट करण्यासाठी प्लेइंग ११ मध्ये करणार मोठा बदल

India vs Australia, Playing 11 Prediction: या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
team india
team indiasaam tv
Published On

India vs Australia, World Cup 2023 Final Playing 11:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ दोन हात करताना दिसून येणार आहेत. भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत.

तसेच ही स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७० धावांनी विजय मिळवला. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात एक मोठा बदल केला जाऊ शकतो.

भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. शुक्रवारी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून आले. कर्णधार रोहित शर्मा स्लीपमध्ये झेल टिपण्याचा सराव करताना दिसून आला.

यावरून असा अंदाज लावला जात आहे की, ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विन देखील कसून सराव करताना दिसून आला.

या महत्वाच्या सामन्यापूर्वी आर अश्विन गोलंदाजीत घाम गाळताना दिसून आला आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की , या सामन्यात भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.

आर अश्विनचा अनुभव भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर आर अश्विनची प्लेइंग ११ मध्ये एंट्री झाली तर मोहम्मद सिराजचा पत्ता कट होऊ शकतो. (Latest sports updates)

team india
IND vs AUS 2023, Final: क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; चेक करा टाईमटेबल

अश्विनला खेळवणं का गरजेचं?

आर अश्विन हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. डेव्हिड वॉर्नर हा भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतो. मात्र त्याला आऊट कसं करायचं हे आर अश्विनला चांगलच माहीत आहे. हे प्रमुख कारण आहे ज्यामुळे आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

team india
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून प्रमुख खेळाडू होऊ शकतो बाहेर

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज/आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com