R Ashwin Record: अश्विनचा फलंदाजीत मोठा कारनामा! कपिल देव अन् धोनीनंतर असा कारनामा करणारा ठरला तिसराच भारतीय

IND vs WI 2nd Test: या खेळीसह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
r ashwin
r ashwin saam tv
Published On

R Ashwin Record In IND vs WI 2nd Test: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामान्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून विराट कोहली आणि रोहित शर्माने दमदार कामगिरी केली आहे.

तर आर अश्विनने देखील अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले आहे. या खेळीसह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

r ashwin
IND vs WI 2nd Test: काय योगायोग म्हणावा हा! विराटच्या 29 व्या सेंच्युरीचं अन् क्रिकेटच्या देवाचं आहे खास कनेक्शन

भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४३८ धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघाकडून ४ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत. ज्यात आर अश्विनचा देखील समावेश आहे. त्याने वेस्टइंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ५६ धावांची खेळी केली.

या खेळीसह तो भारतीय संघासाठी सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने माजी भारतीय खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

आर अश्विनने भारतीय संघासाठी सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३१६२ धावा केल्या आहेत.

तर व्हीव्हीएस लक्ष्मणने या क्रमांकावर ३१०८ धावा केल्या होत्या. आर अश्विनच्या पुढे आता केवळ एमएस धोनी आणि कपिल देव आहेत. एमएस धोनीने या क्रमांकावर खेळताना ४७१७ धावा केल्या होत्या. तर कपिल देवने ५११६ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

r ashwin
Sachin Tendulkar On Virat kohli: मास्टर- ब्लास्टरही झाला विराटच्या खेळीचा जबरा फॅन! शतक झळकावताच केली खास पोस्ट- PHOTO

कसोटी क्रिकेटमध्ये ६ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज..

कपिल देव- ५५१६ धावा

एमएस धोनी- ४७१७ धावा

आर अश्विन - ३११२ धावा

व्हीव्हीएस लक्ष्मण- ३१०८ धावा

रविंद्र जडेजा- २६९६ धावा

भारतीय संघाची दमदार सुरूवात..

भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने ८० धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ५७ धावांचे योगदान दिले.

या दोघांनी मिळून १३९ धावांची भागीदारी केली. तसेच विराट कोहलीने १२१ धावांची खेळी केली. शेवटी रविंद्र जडेजाने ६१ आणि आर अश्विनने ५६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा पहिला डाव ४३८ धावांवर संपुष्टात आला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्टइंडीज संघाने दुसऱ्या दिवसाखेर १ गडी बाद ८६ धावा केल्या आहेत. कर्णधार ब्रेथवेट ३७ धावांवर नाबाद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com