वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७० धावांनी धुव्वा उडवत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत फायनमध्ये प्रवेश केला आहे.
हे दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमी अहमदाबादची वाट धरणार आहेत. दरम्यान या सामन्यासाठी मध्य रेल्वेने वर्ल्डकप स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. या ट्रेनचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे.
वर्ल्डकप सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना मध्य रेल्वेने गुड न्यूज दिली आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा फायनलचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन स्पेशल ट्रेन सुटणार आहे. ही स्पेशल ट्रेन CSMT ते अहमदाबाद अशी असणार आहे.
या गाडीचा नंबर ०११५३ असून ही ट्रेन मुंबईतील सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा या स्थानकांवर हॉल्ट घेत जाणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन शनिवारी रात्री १०:३० वाजता सुटेल. तर सकाळी ६:४० वाजून मिनिटांनी अहमदाबादला पोहचेल. अहमदाबादहून मुंबईच्या दिशेने येताना ही ट्रेन रात्री १:४५ वाजता निघणार असून सकाळी १०:३५ मिनिटांनी ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल. (Latest sports updates)
भारतीय संघ १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. २००३ मध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे यावेळी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे. २०११ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.