Mumbai Air Pollution
Mumbai Air PollutionSaam TV

Mumbai Air Pollution: प्रदूषण रोखण्याच्या योजनेचा डंपर चालकांसह मजुरांनाही फटका; ऐन दिवाळीत कुटुंबावर उपासमारीची वेळ?

Mumbai Air Pollution Latest News: अंधेरी तहसील कार्यालयावर शेकडो डंपर चालक आणि क्लीनर तसेच मोलमजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निदर्शन आंदोलन केले.
Published on

संजय गडदे

Mumbai News:

मागील काही दिवसांपासून मुंबईच्या हवेतील प्रदूषण पातळी भलतीच वाढली आहे. यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकार सोबतच महापालिकेने देखील कंबर कसली असून मुंबईत फटाके फोडण्यासोबतच इमारतीची बांधकामे आणि पाडकामे करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Air Pollution
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; गावदेवी पोलिसांत गुन्हा, नराधमाला अटक

ही बंदी १९ नोव्हेंबरपर्यंत कायम असणार आहे. मात्र प्रदूषण रोखण्यासाठीच्या या सरकारी उपाययोजनेमुळे मुंबईतील पन्नास हजाराहून अधिक डंपर चालक आणि त्यावरील सुमारे अडीच लाख कर्मचारी आणि त्यांच्या दहा लाख कुटुंबीयांवर मात्र ऐन दिवाळीत उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आज अंधेरी तहसील कार्यालयावर शेकडो डंपर चालक आणि क्लीनर तसेच मोलमजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निदर्शन आंदोलन केले.

यावेळी सरकारचा हा निर्णय म्हणजे त्यांचं फेल्युअर असल्याचा आरोप आंदोलकांचे नेतृत्व करणारे यल्लाप्पा कुशाळकर यांनी केला. शिवाय एकीकडे गोरगरीब डंपर चालकांच्या डंपरवर बंदी घालण्यात आलीये.

असे असतानाच दुसरीकडे मात्र अदानी आणि लोढा यासारख्या मोठ्या बिल्डरांचे कंत्राटदार मात्र राजरोसपणे हजारो डंपर आजही चालवत आहे. सरकारने या गोरगरीब डंपर चालक क्लीनर आणि त्यावरील लेबर यांच्या कुटुंबीयांना काहीतरी मोबदला द्यायला हवा होता असे कुशालकर यांनी म्हटले आहे.

Mumbai Air Pollution
Jalgaon Crime: रुग्णालयात दाखल महिलेसोबत वॉर्डबॉयचे अश्लील कृत्य; पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com