World Cup 2023: पराभव जिव्हारी लागला, सेमीफायनल गमावताच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यात आलं पाणी, VIDEO

Australia vs South Africa, Semi Final 2023: या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
south africa
south africainstagram
Published On

Australia vs South Africa World Cup Latest Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय मिळवला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ करून सेमीफायनल गमावलेल्या दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू निराश असल्याचं दिसून आलं आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला. मात्र सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंचे डोळे पाणावले आहेत. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.

south africa
World Cup 2023: दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली 'चोकर्स' ! भारत - ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्डकप २०२३ फायनल

एडेन मार्करम अक्षरशः रडला...

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने चेंडू एडेन मार्करमच्या हाती सोपवला. त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

पॅट कमिन्स फलंदाजी करत असताना चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षकाच्या हातात गेला खरा पण यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून हा झेल निसटला.हा झेल सुटताच एडेन मार्करम डोक्याला हात लावून खाली बसला. त्याचे डोळे पाणावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा संघ चोकर्स ठरला आहे. यावेळीही दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकपच्या सेमी फायनलमधून बाहेर पडावं लागलं आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. त्याने ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती.

south africa
World Cup 2023: ना शमी,ना विराट, ना अय्यर! टीम इंडियाचा खरा हिरो रोहितच;दिग्गज खेळाडूचं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com