World Cup 2023: दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली 'चोकर्स' ! भारत - ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्डकप २०२३ फायनल

Australia Enters In World Cup 2023 Final: हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
ind vs aus
ind vs aussaam tv news
Published On

Australia vs South Africa World Cup Semi Final 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारे २ संघ ठरले आहेत. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावांची गरज होती.

आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र दक्षिण आफ्रिकच्या गोलंदाजांनी संघर्ष करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा चांगलाच घाम काढला. शेवटी ऑस्ट्रेलियाने बाजी मारत ३ गडी राखून विजय मिळवला. या थरारक विजयानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. (Cricket World Cup 2023)

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने ३० धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर २९ धावा करत माघारी परतला. (Australia vs South Africa)

डेव्हिड मिलरची झुंजार खेळी...

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. कारण कर्णधार टेम्बा बावूमा पहिल्याच षटकात शून्यावर माघारी परतला.

तर दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फलंदाज क्विंटन डी कॉक ३ धावा करत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं इथे कौतुक करावं लागेल. कारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सेट होऊ दिलं नाही. रासी वान दर दुसेन ६, एडेन मार्करम १० धावा करत माघारी परतले.

टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर हेनरी क्लासेनने डेव्हिड मिलरसोबत मिळून डाव सावरला. हेनरी क्लासेनने अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना ट्रेवीस हेडने त्याला ४७ धावांवर बाद करत माघारी धाडलं. क्लासेन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने मोर्चा सांभाळत एक बाजू धरून ठेवली. त्याने ११६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २१२ धावांपर्यंत मजल मारली. (Latest sports updates)

ind vs aus
IND vs NZ, Semi Final 2023: गिलचा गगनचुंबी षटकार,बॉल थेट ड्रेसिंग रुममध्ये!रोहितची भन्नाट रिॲक्शन Viral;Video

भारतीय संघासोबत रंगणार फायनलचा सामना..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७० धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.( India vs Australia World Cup Final)

तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम सामना खेळताना दिसून येणार आहेत.

ind vs aus
World Cup Final : सिराजनं वडिलांसाठी व्यक्त केली खास इच्छा! पोस्ट शेअर करत म्हणाला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com