IND vs NZ, Semi Final 2023: गिलचा गगनचुंबी षटकार,बॉल थेट ड्रेसिंग रुममध्ये!रोहितची भन्नाट रिॲक्शन Viral;Video

Shubman Gill Six: या सामन्यात शुभमन गिलने षटकार मारल्यानंतर रोहितने दिलेली रिॲक्शन व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Reaction On Shubman Gill's Six in IND Vs NZ World Cup Semi Final Match 2023
Rohit Sharma Reaction On Shubman Gill's Six in IND Vs NZ World Cup Semi Final Match 2023Shubman Gill's Six - twitter
Published On

गिलचा गगनचुंबी षटकार

Rohit Sharma Reaction On Shubman Gill's Six:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनल सामन्याचा थरार सुरु आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने खणखणीत षटकार मारला. हा षटकार मारल्यानंतर रोहित शर्माने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

या खेळपट्टीवर नाणेफेक जिकंणं अतिशय महत्वाचं होतं. रोहितने नाणेफेक जिंकलं आणि क्षणही न दवडता फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली.

दोघांनी मिळून ७१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४७ धावा करत माघारी परतला. तर शुभमन गिलने एक बाजू धरून ठेवत तुफान फटकेबाजी सुरु ठेवली. त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना १७ वे षटक टाकण्यासाठी मिचेल सँटनर गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडूवर गिलने स्टेप आऊट होऊन समोरच्या दिशेने खणखणीत षटकार मारला.

हा षटकार त्याने समोरच्या दिशेने असलेल्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने मारला. हा षटकार पाहुन ड्रेसिंग रुममध्ये असलेला भलताच खुश झाला. तो त्याचं कौतुक करताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दुखापतीमुळे सोडावं लागलं मैदान..

तर झाले असे की, २३ वे षटक सुरु होते. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने एक धाव घेतली. मात्र ही धाव पूर्ण करत असताना शुभमन गिलला क्रँम्प आल्याचं दिसून आला. त्याला धावताना त्रास होत होता.

त्यावेळी फिजियो मैदानावर आले. मात्र शुभमन गिलला होत असलेल्या वेदना पाहून डगआऊटमध्ये असलेल्या कर्धणार रोहित शर्माने त्याला मैदान सोडण्याचा इशारा केला.

त्यामुळे तो ७८ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला आहे. शुभमन गिलने मैदान सोडल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com