Rohit Sharma: हिटमॅनचा 'युनिव्हर्स बॉस'ला धक्का! वर्ल्डकप स्पर्धेत ठरलाय बेस्ट सिक्स हिटर; मोडले २ मोठे रेकॉर्ड्स

Rohit Sharma Most Sixes Record: या सामन्यात रोहित शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv
Published On

Rohit Sharma Record, Most Sixes In ODI World Cup:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनसचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माने षटकार मारण्याचा बाबतीत वर्ल्डकप स्पर्धेत मोठा विक्रम केला आहे. मोठ्या विक्रमाच्या बाबतीत त्याने ख्रिस गेललाही मागे सोडलं आहे.

या बाबतीत बनलाय नंबर १...

या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला येताच रोहितने सुरुवातीपासूनच हल्लाबोल करायला सुरुवात केली. त्याने ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. पाचव्या षटकात ट्रेंट बोल्टच्या षटकात खेचलेला षटकार विक्रमी ठरला आहे.

ट्रेंट बोल्टने टाकलेल्या शॉर्ट बॉलवर रोहितने मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार मारला. हा त्याचा वर्ल्डकप कारकिर्दीतील ५० वा षटकार ठरला आहे. यासह तो वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावे होता. ख्रिस गेलने ४९ षटकार मारले होते. तर एबी डिविलियर्सने ३७ आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावे ३१ षटकार मारण्याची नोंद आहे.

rohit sharma
IND vs NZ, Semi Final 2023 Toss: टॉस जिंकला आता मॅचही जिंकणार! रोहितने सांगितलं फलंदाजी घेण्याचं कारण

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज...

रोहित शर्मा - ५० षटकार*

ख्रिस गेल - ४९ षटकार

एबी डिविलियर्स - ३७ षटकार

रिकी पाँटिंग- ३१ षटकार

ब्रेंडन मॅक्क्युलम- २९ षटकार

यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक २७ षटकार मारले आहेत.

या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या स्थानी आहे. ख्रिस गेलने २६ षटकार मारले होते. तर ओएन मॉर्गनच्या नावे २२ षटकार मारण्याची नोंद आहे. (Latest sports updates)

rohit sharma
IND vs NZ: डायरेक्ट हिट, रनआऊट अन् वर्ल्डकपमधून एक्झिट! पाहा १४० कोटी भारतीयांचं मन दुखावणारा तो क्षण; VIDEO

एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज...

रोहित शर्मा - २७ षटकार (२०२३)*

ख्रिस गेल- २६ षटकार (२०१५)

ओएन मॉर्गन- २२ षटकार (२०१९)

ग्लेन मॅक्सवेल - २२ षटकार (२०२३)

एबी डिविलियर्स - २१ षटकार (२०१५)

क्विंटन डी कॉक - २१ षटकार (२०२३)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com