IND vs NZ: डायरेक्ट हिट, रनआऊट अन् वर्ल्डकपमधून एक्झिट! पाहा १४० कोटी भारतीयांचं मन दुखावणारा तो क्षण; VIDEO

Ms Dhoni Run Out Video: भारतीय संघाला २०१९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
MS Dhoni run out
MS Dhoni run outtwitter
Published On

IND vs NZ, World Cup Semi Final:

कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन भारताचा संघ मैदानात उतरणार आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कारण न्यूझीलंडने २०१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला धूळ चारली होती. या सामन्यात एमएस धोनीचा रनआऊट पराभवामागचं मुख्य कारण ठरला होता. यावेळी भारताचा संघ न्यूझीलंडला धूळ चारणार का? जाणून घ्या.

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ वर्ल्डकप स्पर्धेतील भारत - न्यूझीलंड यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे धुतला गेला होता. दोन्ही संघ थेट सेमीफायनलच्या सामन्यात आमने सामने आले होते.

मात्र सकारात्मक बाब म्हणजे यावेळी भारतीय संघाने न्यूझीलंडला साखळी फेरीत पराभूत केलं आहे. यावेळी भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करणार अशी चिन्हं दिसू लागली आहेत. कारण गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसून येत आहेत.

धोनीचा रनआऊट अन् भारताचा पराभव..

वर्ल्डकप २०१९ स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ८ गडी बाद २३९ धावांचा डोंगर उभारला. आव्हान छोटं होतं.

असं वाटलं होतं की, भारतीय संघ या आव्हानाचा सहज पाठलाग करेल. मात्र फलंदाजीला येताच भारतीय संघाला ३ मोठे धक्के बसले. अवघ्या ५ धावांवर भारताचे ३ फलंदाज तंबूत परतले. टॉप ऑर्डरला या महत्वाच्या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही. अवघ्या ७१ धावसंख्येवर भारताचा अर्धा संघ तंबूत होता. (Latest sports updates)

MS Dhoni run out
IND vs NZ Toss Prediction: टॉस ठरणार बॉस! सेमीफायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाने प्रथम काय करायला हवं?

सातव्या क्रमांकावर एमएस धोनी फलंदाजीला आला. तर आठव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी आला. दोघांची जोडी चांगलीच जमली. दोघांनी भागीदारी करत धावसंख्या २०८ पर्यंत पोहचवली. जडेजा ७७ धावांवर फलंदाजी करत असताना बाद झाला. त्याच्या पाठोपाठ धोनीही धावबाद होऊन माघारी परतला. मार्टिन गप्टीलच्या एका थ्रोमुळे १४० कोटी भारतीयांचं मन तुटलं.

MS Dhoni run out
IND vs NZ Playing XI: टीम इंडियासाठी गुड न्यूज! भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या गोलंदाजाला विलियम्सन बसवणार बाहेर? पाहा प्लेइंग ११

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com