IND vs NZ Playing XI: टीम इंडियासाठी गुड न्यूज! भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या गोलंदाजाला विलियम्सन बसवणार बाहेर? पाहा प्लेइंग ११

India vs New Zealand Playing 11 Prediction: भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सेमीफायनलच्या सामन्यात आमने सामने येणार आहेत.
team india
team indiasaam tv news
Published On

India vs New Zealand Playing 11 Prediction:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. स्पर्धेतील ९ पैकी ९ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

तर न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये आमने सामने येणार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ पराभवाची परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारतीय संघात होणार बदल?

भारतीय संघाला साखळी फेरीतील सामने सुरु असताना मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतुन बाहेर पडला. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात बदल केला जाईल अशी चर्चा सुरु होती.

मात्र असं काहीच झालं नाही. भारतीय संघात कुठलाही बदल केला गेला नव्हता. या सामन्यातही कुठलाही बदल केला जाणार नाही.

team india
World cup 2023: IND vs NZ सामन्यासाठी ICC कडून सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर; 2019 WC सेमी फायनलच्या अंपायरचाही समावेश

न्यूझीलंडच्या प्लेइंग ११ मध्ये होऊ शकतो बदल...

न्यूझीलंडने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. मात्र काही सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ बॅकफुटवर गेला. अखेर न्यूझीलंडने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल केला होता. या सामन्यासाठी ईश सोढीला बसवून लॉकी फर्ग्सुसनला संघात स्थान देण्यात आलं होतं.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम साउदीच्या जागी काईल जेमिसनला संधी दिली जाऊ शकते. तर केन विलियम्सनचं पुनरागमन ही न्यूझीलंड संघासाठी सकारात्मक बाब असणार आहे. तो भारतीय संघाविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे. (Latest sports updates)

team india
IND vs NZ Semi Final: तर न्यूझीलंडचा पराभव निश्चित! सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

या सामन्यासाठी अशी असू शकते न्यूझीलंडची प्लेइंग ११:

डेवोन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलिम्सन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लेथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउदी/काईल जेमिसन, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com