वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्सची यादी जाहीर केली आहे.
भारतीय संघ अव्वल स्थानी..
भारतीय संघाने या स्पर्धेतील ९ पैकी ९ सामने जिंकले आहेत. १८ गुणांसह भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर ५ सामने जिंकून १० गुणांसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
या स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये रंगणार आहे. तर दुसरा सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये रंगणार आहे.
गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी तर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. हे दोन्ही संघ १६ नोव्हेंबर रोजी आमने सामने येणार आहेत.
हे असतील अंपायर्स..
या सामन्यासाठी आयसीसीकडून अधिकृतरित्या अंपायर्सची घोषणा करण्यात आली आहे. ऑन फिल्ड अंपायर म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉड टकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर जोएल विल्सन थर्ड अंपायरच्या भूमिकेत असणार आहेत.
मुख्य बाब म्हणजे रिचर्ड केटलबरो हे अंपायर नसणार आहेत. त्यामुळे ही भारतीय क्रिकेट संघासाठी गुड न्यूज असणार आहे. कारण रिचर्ड केटलबरो ज्या ज्या नॉक आऊट सामन्यांमध्ये अंपायर होते, तो सामना भारतीय संघाने गमावला आहे. तर इलिंगवर्थ आणि रॉड टकर २०१९ वर्ल्डकप सेमी फायनलमध्येही अंपायरच्या भूमिकेत होते. (Latest sports updates)
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य...
भारतीय संघ हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील एकही सामना न गमावणारा एकमेव संघ आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि शेवटी नेदरलँडवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता भारतीय संघ वर्ल्डकप सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.