World Cup 2023: ICC कडून मोठी अपडेट! भारत-न्यूझीलंड सामना पूर्ण झाला नाही, तर काय असतील 'रिझर्व्ह डे'चे नियम?

World Cup 2023 Reserve Day: आयसीसीने रिझर्व्ह डे बाबत मोठी अपडेट दिली आहे.
ind vs nz
ind vs nzSaam TV

World Cup, IND vs NZ Reserve Day Rules:

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यांना लवकरच प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत साखळी फेरीतील ४५ सामने खेळवले गेले आहेत. तर येत्या १५ नोव्हेंबर रोजी वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी आयसीसीकडून मोठी अपडेट समोर आली आहे.

कधी आणि कुठे होणार वर्ल्डकप सेमीफायनलचे सामने?

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाईल. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Semi Final) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

तर स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनच्या (Eden Gardens)मैदानावर रंगणार आहे.

राखीव दिवस..

सेमीफायनलच्या सामन्यापू्र्वी आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. कारण सेमीफायनल आणि फायनलसाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली आहे. जर या सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही तर हे सामने दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येतील. (Latest sports updates)

राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर गुणतालिकेत चांगल्या स्थितीत असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

जर राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली तर भारताचा संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी पात्र ठरेल. तर चौथ्या स्थानी असलेला न्यूझीलंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडेल. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

या सामन्यात जर पाऊस पडला तर हा सामना राखीव दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येईल. जर राखीव दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकप फायनलसाठी पात्र ठरेल.

ind vs nz
IND vs NZ Semi Final: तर न्यूझीलंडचा पराभव निश्चित! सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com