Rohit Sharma News: रोहित शर्मानं सेमिफायनलआधी दिली मोठी कबुली; न्यूझीलंडविरुद्धचा प्लानही सांगितला!

Rohit Sharma News: आता उद्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची भिडत न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी कबुली दिली आहे.
Rohit sharma
Rohit sharmatwitter
Published On

Rohit Sharma News:

विश्वचषकाच्या स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत सलग ९ सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने ९ सामन्यात धमाकेदार विजय मिळवल्यानंतर संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उद्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाची भिडत न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी कबुली दिली आहे. (Latest Marathi News)

'टीम इंडियाने १९८३ साली विश्वचषक जिंकला, तेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता. त्यात २०११ मध्ये आम्ही जिंकलो,तेव्हा त्यातील निम्मे खेळाडू खेळत नव्हते. मागील विश्वचषक खेळाडूंनी कसा जिंकला, याबद्दल ते कधीच बोलताना दिसले नाहीत. आम्ही आमचा खेळ कसा सुधारू शकतो, यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. हीच सध्याच्या खेळाडूंची जमेची बाजू आहे, असं भाष्य रोहित शर्माने माध्यमांशी संवाद करताना सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit sharma
Abdul Razzaq Controversial Statement: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं ऐश्वर्या रायवर वादग्रस्त वक्तव्य, विधानामुळे नेटकरी संतप्त

'भूतकाळात काय घडलं, याबद्दल तुमच्या मनात आहे. पण गेल्या १० किंवा ५ वर्षांपूर्वी विश्वचषकात काय घडलं याबद्दल बोलण्यासारखं फार काही नाही. विश्वचषकातील सामने खेळताना खेळाडूंवर दबाव असल्याची प्राजंळ कबुली रोहित शर्माने दिली. तसेच आतापर्यंत झालेल्या खेळात खेळाडूंनी दबाव चांगल्याप्रकारे हातळल्याबद्दल त्याने त्यांचं कौतुक केलं आहे.

रोहित पुढे म्हणाला, 'आम्ही गेल्या ९ सामन्यात दबाव चांगल्यारित्या हाताळला आहे. पहिल्या सामन्यापासून ते नवव्या सामन्यापर्यंत खेळाडूंनी चांगली कामगिरी दाखवली आहे. आम्ही खेळावर लक्ष केंद्रीत केलं. आम्ही पुढील दोन सामन्यावर असंच लक्ष केंद्रीत करणार आहोत. कोणत्याही फॉरमॅटमधील क्रिकेट असलं तरी दबाव असतोच'.

Rohit sharma
World Cup: क्रिकेटप्रेमींनो बनावट तिकिटांपासून साधव व्हा! सेमिफायनलच्या सामन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी चाहत्यांना केलं सावध

'अनेकांचं असंच म्हणणं असतं की, सामना जिंकला पाहिजे. शतक झालं पाहिजे. पाच गडी बाद केले पाहिजे. काही खेळाडूंनी २५० सामने खेळले आहे किंवा ५ सामने खेळले आहे तरी त्यांना दबावातून जावंच लागतं. भारतीय खेळाडूंना दबाव असतोच. आम्ही दबाव बाजूला ठेवून खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे, असेही रोहितने पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com