Australia Squad: भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर! विस्फोटक फलंदाजाकडे नेतृत्वाची जबाबदारी

Australia Squad For T20 Series Against India: या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
australia cricket team
australia cricket teamsaam tv news
Published On

Australia Squad For T20 Series Against India:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडू पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडला विश्रांती देण्यात आली आहे. तर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथचं संघात कमबॅक केलं आहे.

कमिन्स आणि हेजलवूडसह, शॉन मार्श, मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीनला देखील विश्रांती देण्यात आली आहे.

मॅथ्यू वेडकडे संघाची जबाबदारी..

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी मॅथ्यू वेडकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघातील प्रमुख खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचं कमबॅक झालं आहे.

तर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस,ट्रेविस हेड आणि टीम डेविडला देखील या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. (Latest sports updates)

australia cricket team
World Cup 2023 Points Table: डायरीत नोट करून ठेवा! हेच '४' संघ करणार सेमीफायनलमध्ये प्रवेश

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरनडार्फ, सीन एबॉट, टीम डेविड, नाथन एलिस, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षख), स्पेंसर जॉनसन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा.

australia cricket team
World Cup Points Table: श्रीलंकेच्या विजयानं पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका! इंग्लंडचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर

भारत- ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचं वेळापत्रक..

पहिला टी-२० सामना – २३ नोव्हेंबर – विशाखापट्टणम

दुसरा टी -२० सामना - २६ नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम

तिसरा टी-२० सामना - २८ नोव्हेंबर - गुवाहाटी

चौथा टी-२० - ०१ डिसेंबर - नागपूर

पाचवा टी-२० सामना - ०३ डिसेंबर - हैदराबाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com