ICC ODI Ranking: वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाचाच दबदबा! टॉप-४ मध्ये ३ भारतीयांचा समावेश

ICC ODI Batsman Ranking: आयसीसीने नुकताच वनडे फलंदाजांची यादी जाहीर केली आहे.
virat kohli rohit sharma
virat kohli rohit sharmasaam tv news
Published On

ICC ODI Ranking News:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या समाप्तीनंतर आयसीसीने वनडे फलंदाजांची यादी प्रसिद्द केली आहे. या यादीत भारतीय फलंदाजांना मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या यादीतील टॉप ४ फलंदाजांमध्ये ३ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. शुभमन गिल या यादीत अव्वल स्थानी असून विराट कोहली तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत विराटची बॅट जोरदार तळपली. त्याने ११ सामन्यांमध्ये ७६५ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. तर या खेळीचा फायदा त्याला आयसीसीच्या रँकिंगमध्येही झाला आहे.

नंबर १ बनण्यासाठी त्याला केवळ ३५ रेटिंग पॉईंट्सची गरज आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम या यादीत ८२४ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. लवकरच तो विराटला मागे सोडू शकतो. तर विराट कोहलीचे रेटिंग पॉईंट्स ७९१ आणि रोहित शर्माचे रेटिंग पॉईंट्स ७६९ इतके आहेत. (Latest sports updates)

virat kohli rohit sharma
Ind vs Aus, World Cup 2023: टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न २ चुकांमुळे भंगलं; अन्यथा निकाल काही वेगळाच असता

विराट कोहलीने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ३ शतकं झळकावली आहेत. या स्पर्धेत त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे सर्वाधिक ५० शतकांची नोंद आहे.

तर रोहित शर्माने या स्पर्धेत ५९७ धावा केल्या. ते एकाच वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे शुभमन गिलने ३५४ आणिा बाबर आझमने ३२० धावा केल्या आहेत. मात्र तरीदेखील पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचू शकला नव्हता.

गोलंदाजीत केशव महाराज अव्वल स्थानी कायम...

गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज अव्वल स्थानी कायम आहे. तर वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनाही या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. संघातील वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

तर त्याचा सहकारी मिचेल स्टार्क १२ व्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारतीय संघातील गोलंदाज मोहम्मद सिराज तिसऱ्या स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह चौथ्या आणि कुलदीप यादव सहाव्या स्थानी आहे.

virat kohli rohit sharma
David Warner Tweet: मला माफ करा.. वर्ल्डकप जिंकल्यानंतर वॉर्नरने भारतीय फॅन्सची मागितली माफी; काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com