आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी (२१ नोव्हेंबर) काही मोठे निर्णय घेतले आहेत. अहमदाबादमध्ये आयसीसीची ही मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये काही महत्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यात तृतीयपंथी खेळाडूंना महिला संघात खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर गोलंदाजांबाबत आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तृतीयपंथी खेळाडूंना महिला संघात खेळण्यावर बंदी ...
आयसीसीने लागू केलेल्या नव्या नियमानूसार ट्रान्सवुमनला महिला संघात खेळता येणार नाही. काही पुरुष सर्जरी किंवा ट्रिटमेंट करुन महिला बनतात ते देखील महिला संघाचा भाग बनू शकणार नाहीत.
हा नियम देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागू करण्यात आलेला नाही. क्रिकेट बोर्ड देशांतर्गत क्रिकेटमध्ये तृतीयपंथांचा संघात समावेश करु शकतात.याच वर्षी २९ वर्षीय मॅक्गाय कॅनडाकडून खेळण्यासाठी मैदानावर उतरली होती. मात्र आता ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही.(Latest sports updates)
गोलंदाजांसाठी नवा नियम...
आयसीसीने गोलंदाजांसाठी नवीन नियम लागू केला आहे. गोलंदाजांना पुढील षटक सुरु करण्याासाठी ६० सेंकदांचा अवधी दिला जाणार आहे. ३ वेळा षटक सुरु करण्यास ६० सेकंदांहून अधिकचा वेळ लागला, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावांची पेनल्टी बसेल. डिसेंबर २०२३ पासून ते एप्रिल २०२४ पर्यंत हा नियम ट्रायल म्हणून लागू केला जाईल. त्यानंतर हा नियम कायम ठेवायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.
६ डिमेरिट पाँईट्स मिळताच आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता येणार नाहीत..
आयसीसीने मैदानाच्या खेळपट्टीला आणि आउटफिल्डला रेटिंग देण्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. आता ५ वर्षांच्या आत जर कुठल्याही संघाला ६ डिमेरीट पॉईंट्स मिळाले ,तर त्या मैदानावर कुठलेही आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नाहीत. यापूर्वी ५ डिमेरीट पॉईंट्सवर सदस्यत्व रद्द केलं जात होतं.
श्रीलंकेकडून अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद काढून घेण्यात आलं आहे...
श्रीलंकेकडून आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचं यजमानपद काढून घेण्यात आलं आहे. आता या स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.