ICC Cricket Rule: गोलंदाजांच्या चुकीला माफी नाही! ICCनं आणला नवा नियम

ICC Cricket : आयसीसीच्या बैठकीत बोर्डाच्या निलंबनानंतरही श्रीलंकेचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो, असा निर्णयही घेण्यात आलाय.
ICC Cricket
ICC CricketYandex
Published On

ICC Cricket Rule:

एकदिवसीय वर्ल्डकप २०२३ झाल्यानंतर आयसीसीने क्रिकेटच्या नियमात बदल केलाय. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला. यंदाच्या वर्ल्डकपमधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेशच्या संघाचा झालेला सामना खूप चर्चेत राहिला. तो म्हणजे टाईम आऊटचा नियम. या नियमाच्या आधारे बांगलादेशच्या संघाने लंकेच्या मॅथ्यूजला एक चेंडूही खेळू न देताना बाद केलं होतं. दरम्यान या सामन्यानंतर वादही झाला होता. आता आयसीसीने क्रिकेटच्या नियमात बदलाय केलाय. (Latest News)

आयसीसीने गोलंदाजांसाठीही आता टाईम आऊटसारखे नियम लागू केले आहेत. आधी फक्त फलंदाजांसाठी हा नियम लागू होता. क्रिकेटची प्रशासकीय संस्था आयसीसीने गोलंदाजाने डावात तिसऱ्यांदा नवीन षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये लागू असेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयसीसीच्या बैठकीत काय निर्णय झाले

सुरुवातीला हा नियम चाचणीसाठी लागू करण्यात येणार आहे. या नियमाची उपयुक्तता आणि परिणाम लक्षात घेऊन तो कायमस्वरूपी लागू करता येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याच आयसीसीच्या बैठकीत बोर्डाच्या निलंबनानंतरही श्रीलंकेचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो, असा निर्णयही घेण्यात आलाय.

मात्र अंडर- १९ विश्वचषक २०२४ चे यजमानपद श्रीलंकेकडून हिसकावून दक्षिण आफ्रिकेला देण्यात आलंय. याचबरोबर जर एखादा खेळाडू पुरुष म्हणून मोठा झाला आणि किशोरवयीन वयात असताना त्याच्या शरीरात होणारे बदल मुलांप्रमाणेच असतील, तर तो लिंगबदल करूनही महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास अपात्र असेल.

काय केलाय बदल

“आयसीसीने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत पुरुषांच्या ODI आणि T2 क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर स्टॉप क्लॉक लागू करण्यास सहमती दिलीय. षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाणार आहे. जर गोलंदाजी करणारा संघ जर मागील षटक पूर्ण झाल्यानंतर ६० सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार नसेल तसेच डावात तीनदा असा प्रकार घडला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड आकारला जाणार आहे.

याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर बंधने घालण्याची पद्धतही आयसीसीने बदल केला आहे. खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग नियमांमधील बदलांनाही मान्यता देण्यात आली आहे. खेळपट्ट्यांचे मूल्यांकन करणाऱ्या निकष सोपे करण्यात आली आहेत. कोणत्याही मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षांत पाच डिमेरिट पॉइंट्स दिले गेले तर त्यावर बंदी घालण्यात येत होती असा आधी नियम होता. आता खेळपट्टीच्या डिमेरिटची संख्या वाढवण्यात आलीय. आता ५ ऐवजी ६ डिमेरिट पॉइंट्स खेळपट्टी बाद करण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. आता कोणत्याही मैदानाच्या खेळपट्टीला पाच वर्षांत सहा डिमेरिट पॉइंट्स दिल्यास त्या मैदानावर बंदी घालण्यात येईल.

टाईम आऊटचा नियम काय आहे?

आयसीसी नियम ४०.१.१ नुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील दोन मिनिटांत पुढील फलंदाजाने चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जर ते पूर्ण झाले नाही तर ते टाईम आऊटच्या कक्षेत येते. तर मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या नियमानुसार टाईम आऊटची वेळ तीन मिनिटे आहे. मात्र विश्वचषकात आयसीसीच्या नियमानुसार टाईम आऊटसाठी दोन मिनिटे ठेवण्यात आली आहेत. टाईम आऊट झालेली विकेट कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात जात नाही. तसेच त्यासाठी अतिरिक्त चेंडू जोडला जात नाही.

ICC Cricket
Team India Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ५ प्रबळ दावेदार; यादीत ३ भारतीयांचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com