World Cup : ‘रोहित जगातील सर्वात दुर्दैवी माणूस…’, वर्ल्डकप हिरावून नेणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूनं हिटमॅनला डिवचलं

Rohit Sharma : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना डिवचलं जातंय.
Rohit Sharma
Rohit Sharmayandex

Rohit Sharma unluckiest Man:

वर्ल्डकप २०२३ जिंकण्याचं करोडो भारतीयांचं स्वप्न ऑस्ट्रेलियाच्या संघानं भंग केलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान अंतिम सामना झाल्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरणावेळी हेडने भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माला डिवचलं आहे. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात त्याने रोहित हा दुर्दैवी माणूस असल्याचं विधान केलं. (Latest News)

हेडने १२० चेंडूंचा सामना करत १३७ धावा करत भारताकडून वर्ल्डकप हिसकावून घेतला. अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून रिकी पॉंटिग आणि अॅडम ग्रिलख्रिस्ट याने अंतिम सामन्यात शतक ठोकलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हेडचं हेच शतक भारतीय खेळांडूसाठी डोकेदुखीचं कारण ठरलं. त्याच्या शतकाने ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्डकप जिंकत सहाव्यांदा विश्वविजेता संघ ठरलाय. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना डिवचलं जातंय. पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमनने ऑस्ट्रेलियाच्या संघाचा विजय झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणारं ट्विट करत टीम इंडियाला डिवचलं. ऑस्ट्रेलियासाठी शतकी खेळी करणाऱ्या हेडदेखील कर्णधार रोहित शर्माला डिवचलंय.

काय म्हणाला हेड

वर्ल्डकप २०२३ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर हेडला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यानंतर त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी दोन शब्द बोलून त्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केलं. रोहित हा जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर रोहितने फटकेबाजी केली. त्यानंतर त्याला झेल बाद करण्यात आम्हाला यश आलं, त्यावेळी त्याला अश्रू आवरता आले नाहीत. रोहितचा झेल घेणं हे चांगलं काम होतं असं हेड म्हणाला.

दरम्यान हेडने या सामन्यात १३७ धावा केल्या यात ४ षटकार आणि १५ चौकारांचा समावेश होता. विजयानंतर प्रतिक्रिया देताना हेड म्हणाला,याची अपेक्षा कधीच केली नव्हती. घरी सोफ्यावर बसून पाहण्यापेक्षा खूप चांगलं आहे. योगदान देऊन वास्तवात आनंद झाला. मी जे आधी २० चेंडू खेळलो, त्यामुळे मला जास्त आत्मविश्वास मिळाला. आणि हो, मी हे चालू ठेवण्यात यशस्वी राहिलो. ज्याप्रकारे मार्शने खेळ पुढे नेला, त्याने वातावरण निर्मिती केली. आम्हाला हीच ऊर्जा हवी होती आणि आम्हाला माहिती होते की, खेळपट्टी कठीण असू शकते. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय चांगला होता. मला वाटले की, जसजसा दिवस पुढे गेला, खेळपट्टी चांगली होत गेली.”

वर्ल्डकप २०२३ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने एकाही सामन्यातही पराभव स्वीकारला नव्हता. यामुळे भारतीय संघ वर्ल्डकप जिंकणारच असा विश्वास खेळाडूंसह सर्व भारतीयांना होता. परंतु प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी योजनाबद्ध खेळ करत भारताला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने योग्य योजना आखत टीम इंडियाच्या फलंदाजांना गोलंदाजी केली.

दरम्यान फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माने आक्रमक खेळी करत ४७ धावा केल्या. मॅक्सवेलला दोन तीन फटके मारल्यानंतर त्याने रोहितला झेलबाद केलं. हेडनं उलट्या दिशेने पळत हा झेल घेतला. रोहित शर्मा बाद झाल्याचा क्षण हा त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता असं मत स्मिथ म्हणाला होता.

Rohit Sharma
Ind vs Aus, World Cup 2023: टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न २ चुकांमुळे भंगलं; अन्यथा निकाल काही वेगळाच असता

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com