
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह पुन्हा एकदा भारतीय संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न तुटलं आहे. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने १३७ धावांची खेळी केली.
तर मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी केली. हे दोघेही या सामन्याचे हिरो ठरले. दरम्यान भारतीय संघाच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
या सामन्यासाठी रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलिया संघाला विजयाचा मंत्र दिला होता. त्याने फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भेट घेतली. याबाबत बोलताना पाँटिंग म्हणाला की,'मी खेळाडूंशी चर्चा केली. काही खेळाडू खेळपट्टीबद्दल गोंधळले होते. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही खेळपट्टीचा जास्त विचार करु नका. ही खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी पोषक आहे. तुम्ही या २०-२२ यार्डच्या खेळपट्टीबद्दल विचार करु नका. तु्म्ही मैदानावर जा आणि सर्वोत्तम खेळ करा, विजय तुमचाच होईल.'
तसेच समालोचन करत असताना त्याने भारतीय संघाच्या पराभवाबाबत बोलताना धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला की,' भारतीय संघाला मदत मिळेल अशी खेळपट्टी बनवली गेली. पण त्याच खेळपट्टीने भारतीय संघाचा विश्वासघात केला.जशी खेळपट्टी आशियाई उपखंडात ही तशीच खेळपट्टी होती. पण भारताचा त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.' (Latest sports updates)
ऑस्ट्रेलियाचा जोरदार विजय...
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती.
शुभमन गिल अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. तर रोहित शर्माने ४७ धावांची आक्रमक खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनेही पॅव्हेलियनची वाट धरली. शेवटी विराट आणि राहुलने डाव पुढे नेला. केएल राहुलने या डावात ६६ धावांची खेळी केली. तर राहुलने ५४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २४० धावांपर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २४१ धावांची गरज होती.या धावांचा बचाव करत असताना भारतीय संघाने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला ३ मोठे धक्के दिले होते. शेवटी ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेनने १९२ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयापासून दुर नेलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.