team india
team indiasaam tv

Ricky Ponting On WTC Final: 'इथून भारतीय संघाचं अंतिम सामना जिंकणं कठीण..'दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

WTC FINAL: दिग्गज खेळाडूने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Published on

IND VS AUS WTC FINAL 2023: लंडनच्या ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४६९ धावा केल्या आहेत.

या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगचं म्हणणं आहे की, इथून भारतीय संघाचं अंतिम सामना जिंकणं कठीण आहे. रिकी पाँटिंगला जेव्हा विचारण्यात आलं की, भारतीय संघाने या सामन्यात कमबॅक केलं आहे का? याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' नाही, भारतीय संघाला अजूनही कमबॅक करता आलं नाही. खेळपट्टीवर जिथे गवत आहे तिथे खेळपट्टी अजूनही कोरडी आहे. खेळपट्टीवर अजूनही चेंडू असमान उसळी घेतोय, सीम मुव्हमेंट आहे. भारतीय संघाचं इथून विजय मिळवणं कठीण आहे.

ऑस्ट्रेलियाने उभारला ४६९ धावांचा डोंगर..

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ३ मोठे धक्के दिले. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १६३ तर स्टीव्ह स्मिथने १२१ धावा केल्या. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

team india
WTC Final IND vs AUS : टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सलग दुसऱ्यांदा इंग्लंडमध्ये का? चकीत करणारी माहिती आली समोर

भारतीय संघाने केल्या २९६ धावा..

पहिल्या डावात भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी आली. मात्र सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले.

त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजाने अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सांभाळला. मात्र ४८ धावसंख्खेवर जडेजा बाद होऊन माघारी परतला आहे.

त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. अजिंक्य रहाणेने ८९ धावांची खेळी केली. तर शार्दूल ठाकूरने ५१ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com