IND vs AUS, Final: वीस वर्षांनंतरही ऑस्ट्रेलिया पडली टीम इंडियाला भारी! वर्ल्डकप फायनलमध्ये रोहितसेनेच्या पराभवाची ५ कारणे

Reason Behind Team India Defeat: काय आहेत भारतीय संघाच्या पराभवाची प्रमुख कारणं.
rohit sharma
rohit sharmasaam tv news

Ind vs Aus Final, Reasons Behind Team India Defeat:

भारतीय संघाची वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला मायदेशात पराभूत करत सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान काय आहेत या पराभवाची कारणं? जाणून घ्या.

नाणेफेक..

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या निर्णयानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण जाणकारांनी असा अंदाज वर्तवला होता की, या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करावी. मात्र कमिन्सने

गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चेंडू फसून येत होता. त्यामुळे भारतीय फलंदाजांना फलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागला. याउलट दुसऱ्या डावात फलंदाजी करताना चेंडू बॅटवर येत होता. त्यामुळे धावा करणं सोपं झालं.

rohit sharma
IND vs AUS Final: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! अर्धशतक हुकलं पण वर्ल्डकप स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारा ठरलाय पहिलाच कर्णधार

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी..

या सामन्यात पॅट कमिन्सने घेतलेला निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. त्यांनी सुरुवातीलाच भारतीय संघाला ३ मोठं धक्के दिले. त्यानंतरही फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाही. त्यामुळे भारतीय संघाला मोठी खेळी करता आली नाही.

क्षेत्ररक्षण..

क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ खूप पुढे होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. भारतीय फलंदाजांनी गॅप शोधून काढले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी डाईव्ह मारत लांब लांबचे चेंडू अडवले. त्यामुळे भारतीय फलंदाज दबावात आले. (Latest sports updates)

rohit sharma
IND vs AUS Final Match: रोहितचा मास्टरस्ट्रोक फसला? टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी

भारतीय फलंदाजी..

भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. रोहित शर्माने हा निर्णय योग्य ठरवत तुफान फटकेबाजी केली. सुरुवातीच्या १० षटकात भारतीय संघाने १२ बाऊंड्री मारल्या. तर ११ ते ४० षटकांच्या मध्ये भारतीय फलंदाजांनी केवळ २ तर ४१ ते ५० षटकांच्या मध्ये भारतीय फलंदाजांनी केवळ २ बाऊंड्री मारल्या. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही.

पार्टनरशिप..

भारतीय संघाने दिलेल्या २४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला ३ धक्के बसले. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेनने १९२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com