IND vs AUS Final: जिंकणार तर टीम इंडियाच.. वर्ल्डकपविजेत्या खेळाडूने दिला विजयाचा मंत्र

India vs Australia, World Cup 2023 Final: या सामन्यासाठी माजी भारतीय खेळाडूने विजयाचा मंत्र दिला आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

India vs Australia, World Cup 2023:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ऑस्ट्रेलियाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या आहेत. दरम्यान दुसऱ्या डावातील खेळ सुरु होण्यापूर्वी माजी भारतीय खेळाडूने भारतीय संघाला विजयाचा मंत्र दिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाला या डावात मोठी धावसंख्या करुन ऑस्ट्रेलियावर दबाव बनवण्याची संधी होती. मात्र भारताचा डाव २४० धावांवर संपुष्टात आला. आता भारतीय संघाला जिंकून देण्याची संपूर्ण जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर असणार आहे.

team india
IND vs AUS Live Streaming: घरबसल्या फुकटात वर्ल्डकप फायनलचा थरार अनुभवा ! कधी, कुठे अन् कसा पाहाल सामना? जाणून घ्या...

दरम्यान पहिल्या डावातील खेळ संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करत असलेला हरभजन सिंग म्हणाला की, 'भारताने २४० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या आहेत. हे आव्हान सोपं नाहीये. फायनलसारख्या सामन्यात २४० धावांचं आव्हान खूप आहे. भारतीय संघाने यापूर्वीही कितीतरी वेळा कमी धावांचा यशस्वी बचाव केला आहे. त्यामुळे त्या सामन्यातही असं करतील.' (Latest sports updates)

team india
IND vs AUS, World Cup Final: ना धोनी,ना विराट..जे कोणालाच नाही जमलं ते हिटमॅन करुन दाखवणार! WC फायनलमध्ये रचणार इतिहास

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान..

ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी २४१ धावा करायच्या आहेत. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने ४७ धावा करत दमदार करुन दिली. या डावात केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने केवळ १ चौकार मारला. तर विराट कोहलीने ६३ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com