IND vs AUS Final Match: रोहितचा मास्टरस्ट्रोक फसला? टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी

Ind vs Aus, World Cup Final 2023: भारतीय संघाला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले आहेत.
team india
team indiatwitter
Published On

India vs Australia, World Cup 2023 Final:

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी ,स्टेडियमवर सुरु आहे. या महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला आहे. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले आहेत.

या सामन्याचं नाणेफेक झालं त्यावेळी पॅट कमिन्सने सर्वांनाच मोठा धक्का दिला. नाणेफेक जिंकून फलंदाजी करावी असा अंदाज असताना पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्माने नाणेफेक गमावली असली तरी भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. रोहितने नाणेफेक झाल्यानंतर मान्य केलं की आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार होतो.

भारतीय संघाचा मास्टरस्ट्रोक फसला?

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करुन दिली. अवघ्या ४ षटकात भारतीय संघाने ३० चा आकडा गाठला होता. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शुभमन गिलला अवघ्या ४ धावांवर माघारी धाडलं.

शुभमन गिल बाद झाल्यानंतरही रोहितने आपला गेम प्लान चेंज केला नाही. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर आक्रमण सुरुच ठेवलं. १० षटकात भारतीय संघाने ६ च्या सरासरीने फलंदाजी करत ६६ धावा चोपल्या. सर्व काही सुरळीत असताना रोहित शर्मा ४७ धावांवर बाद होऊन माघारी परतला. फिरकी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद करत माघारी धाडलं. (Latest sports updates)

team india
IND vs AUS Live Streaming: घरबसल्या फुकटात वर्ल्डकप फायनलचा थरार अनुभवा ! कधी, कुठे अन् कसा पाहाल सामना? जाणून घ्या...

रोहित पाठोपाठ श्रेयस अय्यर परतला माघारी..

रोहित आणि शुभमन गिलची जोडी बाद होऊन माघारी परतल्यानंतर विराट आणि अय्यरवर मोठी जबाबदारी होती. मात्र गेल्या सामन्यातील शतकवीर श्रेयस अय्यर मोठी खेळी करु शकलेला नाही. श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पॅव्हेलियनची वाट दाखवली. अवघ्या ८१ धावसंख्येवर भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

team india
IND vs AUS, World Cup Final: ना धोनी,ना विराट..जे कोणालाच नाही जमलं ते हिटमॅन करुन दाखवणार! WC फायनलमध्ये रचणार इतिहास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com