Rahul Gandhi: वर्ल्डकपमधील पराभवावर रंगला राजकीय सामना; PM मोदींवर राहुल गांधींची 'यॉर्कर' टीका; भाजपचही प्रत्युत्तर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या या विधानाचा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत 'एक्स' वर ( आधीच्या ट्विटरवर) पोस्ट केलाय.
Rahul Gandhi
Rahul Gandhix twitter

Rahul Gandhi Comment On PM Narendra Modi:

आपले खेळाडू वर्ल्डकपमध्ये चांगले खेळत होते. परंतु मोदींमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलीय. ते राजस्थानमध्ये निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. वर्ल्डकपचा महासंग्राम झाल्यानंतर देशातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगलाय. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पराभव होण्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका विरोधकांकडून टीका केली जातेय. (Latest News)

राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पराभव झाल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत 'एक्स' वर ( आधीच्या ट्विटरवर) पोस्ट केलाय. पंतप्रधान मोदी टीव्हीवर येतात आणि हिंदू-मुस्लीम करतात. तर कधी क्रिकेट सामना पाहायला जातात. परंतु त्यांच्यामुळे टीम इंडिया हारली, असं राहुल गांधी म्हणालेत.

अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघात अंतिम सामना झाला. यात भारतीय संघाचा पराभव झाला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी मैदानावर उपस्थित होते. परंतु भारतीय संघाचा ६ विकेट राखून पराभव झाला. पराभव झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंचं सात्वंन करण्यास गेले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली, मोहम्मद शमी, यांच्यासोबत मोदी बोलत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले.

परंतु भारताच्या या पराभवामुळे राजकीय वाद सुरू झालाय. विरोधक आणि सत्ताधारी एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ड्रेसिंग रुममधील मोदींच्या फोटोवरून टीका केलीय. त्यांनी मोदींना 'मास्टर ऑफ ड्रामा' म्हटलंय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर टीकेच्या पोस्ट केलीय. 'मास्टर ऑफ ड्रामा इन इंडिया'ने सात्वंन देणारा व्हिडिओ स्वतः बनवून पोस्ट केला. या व्हिडिओमागील खोटा चेहरा समोर आलाय. भारतातील तरूण हे या बेताल कृत्यात फसणार नाही.

राहुल गांधींच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे लोकसभा खासदार रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावर निषेध व्यक्त केलाय. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर माफी मागावी, अशी मागणी केलीय. राहुल गांधी, तुम्हाला काय झाले? देशाच्या पंतप्रधानांसाठी तुम्ही असे शब्द वापरत आहात. उलट पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना प्रेरित केले. जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा भाग आहे. राहुल गांधींनी केलेल्या विधानाविषयी माफी मागावी, असं प्रसाद म्हणाले.

Rahul Gandhi
World Cupच्या महासंग्रामानंतर राजकारणात सुरू झाला 'ब्लेम गेम' ; नेत्यांनी सांगितली पराभवाची कारणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com