Pro Kabaddi 2023: नवीनचा सुपर १० व्यर्थ!Tamil Thalaivas चा Dabang Delhi वर जोरदार विजय; पाहा Highlights

Pro kabaddi Latest Updates In Marathi: स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात तमिल थलायवाज आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात तमिल थलायवाजने बाजी मारत ११ गुणांनी विजय मिळवला आहे.
Tamil Thalaivas vs Dabang Delhi
Tamil Thalaivas vs Dabang DelhiX/Pro kabaddi
Published On

Tamil Thalaivas vs Dabang Delhi, Pro Kabaddi 2023:

प्रो कबड्डी स्पर्धेच्या १० (Pro Kabaddi Season 10) व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्स संघाने तेलुगू टायटन्स संघाचा धुव्वा उडवत जोरदार विजय मिळवला. दरम्यान स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) आणि दबंग दिल्ली (Dabang Delhi) हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात तमिल थलायवाजने बाजी मारत ११ गुणांनी विजय मिळवला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दबंग दिल्ली संघाने नाणेफेक जिंकलं आणि तमिल थलायवाजला प्रथम चढाई करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात दोन्ही संघातील प्रत्येकी १-१ खेळाडूंनी सुपर १० केलं. तमिल थलायवाज संघाकडून खेळताना अजिंक्य पवारने १८ गुणांची कमाई केली. तर दबंग दिल्ली संघाकडून कर्णधार नवीन कुमारने १३ गुणांची कमाई केली. मात्र ही त्याची खेळी व्यर्थ गेली. कारण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही. (Latest sports news in marathi)

Tamil Thalaivas vs Dabang Delhi
IND vs AUS: नेमकं चुकलं तरी कुठं? विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दारुण पराभवानंतर मॅथ्यू वेडने सांगितलं कारण

तमिल थलायवाजने पहिल्या हाल्फनंतर दबंग दिल्लीविरुद्ध १८-१४ अशी आघाडी घेतली. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत सुरु होती. अखेर तमिल थलायवाजने कमबॅक केलं आणि दिल्लीला ऑल आऊट केलं. त्यानंतर तमिल थलायवाजचा संघ ऑल आऊट होण्याच्या वाटेवर होता. अखेर अजिंक्य पवारने नवीनला सुपर टॅकल केलं आणि संघाला कमबॅक करुन दिलं.

Tamil Thalaivas vs Dabang Delhi
Suryakumar Yadav Statement: 'मी खेळाडूंना सांगितलं होतं की..', मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य

या सामन्यातील ३० व्या मिनिटाला दिल्लीचा ऑल आऊट झाला. यासह तमिल थलायवाजने १२ गुणांची आघाडी घेतली. दिल्ली संघाला या सामन्यात हवी तशी पकड करता आली नाही. हेच कारण होतं की, तमिल थलायवाजने सहज विजय मिळवला. तमिल थलायवाजने या सामन्यात ४२ गुणांपर्यंत मजल मारली. तर दबंग दिल्लीला ३१ गुणांपर्यंत मजल मारता आली. तमिल थलायवाजने या सामन्यात ११ गुणांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com