IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून प्रमुख गोलंदाज बाहेर होणार? वाचा कारण

Mohammed Shami News: भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. येत्या १० डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.
team-india
team-indiasaam tv news
Published On

IND vs SA Test Series, Mohammed Shami:

भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. येत्या १० डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने वनडे,टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे.

टी-२० आणि वनडे मालिका झाल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दरम्यान या मालिकेला भारताचा स्टार गोलंदाज मुकणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २६ डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचा सराव सामना २० डिसेंबरला खेळवला जाणार आहे. हा सामना आपपसात असणार आहे.

या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही खेळताना दिसेल. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात मोहम्मद शमीचं (Mohammed Shami) नाव असलं तरीदेखील त्याला आपली फिटनेस सिद्ध करुन दाखवावी लानणार आहे.

इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार पुढच्या आठवड्यात मोहम्मद शमी NCA मध्ये जाणार आहे. इथे त्याची फिटनेस टेस्ट होईल. जर तो या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळेल. (Latest sports updates)

team-india
IND vs SA: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा;बावूमा नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

team-india
PKL 2023: कर्णधार अस्लम चमकला! सुपर १० च्या बळावर पुणेरी पलटणचा गजविजेत्या जयपूरवर शानदार विजय

असं आहे वेळापत्रक..

१० डिसेंबर २०२३: पहिला टी -२० सामना, डर्बन

१२ डिसेंबर २०२३: दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा

१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग

१७ डिसेंबर २०२३: पहिला वनडे सामना, जोहान्सबर्ग

१९ डिसेंबर २०२३ : दुसरा वनडे सामना, ग्केबेरहा

२१ डिसेंबर २०२३: तिसरा वनडे सामना, पार्ल

२६ ते ३० डिसेंबर, २०२३: पहिला कसोटी सामना, सेंच्युरियन

३ जानेवारी ते ७ जानेवारी, २०२४: दुसरा कसोटी सामना, केपटाऊन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com