PKL 2023: कर्णधार अस्लम चमकला! सुपर १० च्या बळावर पुणेरी पलटणचा गजविजेत्या जयपूरवर शानदार विजय

Pro kabaddi 2023 News In Marathi:प्रो कबड्डी २०२३ स्पर्धेत सोमवारी (४ डिसेंबर) झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
pro-kabaddi
pro-kabaddi X/Pro kabaddi
Published On

PKL 2023, Puneri Paltan vs Jaipur Pink Panthers:

प्रो कबड्डी २०२३ स्पर्धेत सोमवारी (४ डिसेंबर) झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पँथर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पुणेरी पलटणने बाजी मारत जयपूर पिंक पँथर्स संघावर ३७-३३ ने विजय मिळवला आहे. पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेल्या अस्लम इनामदारने या सामन्यात आपलं सुपर १० पूर्ण केलं.

या सामन्यात सुरुवातीलाच पुणेरी पलटण संघाने दमदार खेळ करत जयपूर संघावर ६-३ ने आघाडी घेतली. संघ पिछाडीवर असताना जयपूर पिंक पँथर्स संघातील चढाईपटूंनी संघाला दमदार कमबॅक करून दिलं. १४ व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघ ऑल आऊट झाला. जयपूरचा संघ १४-१० ने आघाडीवर होता. ही आघाडी त्यांनी पहिला हाल्फ संपेपर्यंत राखून ठेवली.

दुसऱ्या हाल्फमध्ये अर्जुन देशवालने दमदार खेळ करत आपला सुपर १० पूर्ण केला. हा त्याच्या प्रो कबड्डी लीग कारकिर्दीतील ३६ वा सुपर १० ठरला. जयपूरचा संघ आघाडीवर असताना पुणेरी पलटणने कमबॅक करण्यासाठी जोर लावला. अस्लमने चढाईत २ गुण तर शादलुईने बचाव करताना २ पकड करत जयपूरला ऑल आऊट केलं. (Latest sports updates)

pro-kabaddi
IND vs AUS: ऋतुराजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

सामन्यातील २५ व्या मिनिटापर्यंत पुणेरी पलटण २१-२३ म्हणजेच २ गुणांनी पिछाडीवर होता. अस्लमने चढाईत आणि अजितने बचाव करताना गुणांची कमाई केली आणि ३० व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ २५-२५ च्या बरोबरीवर आले होते. शेवटी अस्लमने सुपर १० पूर्ण करत पुणेरी पलटणला ३७-३३ ने विजय मिळवून दिला.

pro-kabaddi
IND vs AUS: शेवटच्या षटकापूर्वी सूर्याने काय मेसेज दिलेला? सामना जिंकल्यानंतर अर्शदीपने केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com