IND vs AUS: शेवटच्या षटकापूर्वी सूर्याने काय मेसेज दिलेला? सामना जिंकल्यानंतर अर्शदीपने केला खुलासा

Arshdeep Singh Statement: अर्शदीप सिंगने केवळ ३ धावा खर्च केल्या आणि भारतीय संघाला ६ धावांनी विजय मिळवून दिला. दरम्यान सामना झाल्यानंतर अर्शदीप सिंगने मोठा खुलासा केला आहे.
team-india
team-indiatwitter
Published On

Arshdeep Singh On Suryakumar Yadav:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

या सामन्यात भारतीय संघाचा (Team India) पराभव होताना दिसून येत होता. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ १० गरज होती. अशा स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला हुकमी एक्का बाहेर काढला.

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) केवळ ३ धावा खर्च केल्या आणि भारतीय संघाला ६ धावांनी विजय मिळवून दिला. दरम्यान सामना झाल्यानंतर अर्शदीप सिंगने मोठा खुलासा केला आहे.

अर्शदीप सिंगने केला खुलासा..

अर्शदीप सिंगने सुरुवातीच्या ३ षटकात ३७ धावा खर्च केल्या होत्या. असं असतानाही कर्णधार सूर्यकुमार यादवने विश्वास दाखवत त्याला गोलंदाजी करण्यासाठी बोलवलं. अर्शदीप सिंगने हा विश्वास सार्थ ठरवत केवळ ३ धावा खर्च केल्या. यासह भारतीय संघाने या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला.

सामन्यानंतर बोलताना अर्शदीप सिंग म्हणाला की,'शेवटचं षटक टाकण्यापूर्वी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मला, जे होईल ते बघून घेऊ असं म्हणाला. सुरुवातीच्या ३ षटकात मी खूप धावा खर्च केल्या होत्या. असं असतानाही मी आणखी एका संधीची वाट पाहत होतो. मी शेवटच्या षटकात धावांचा यशस्वी बचाव केला. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी टीम मॅनेजमेंटचे आभार मानले.' (Latest sports updates)

team-india
IND vs AUS: नेमकं चुकलं तरी कुठं? विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दारुण पराभवानंतर मॅथ्यू वेडने सांगितलं कारण

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली.

तर अक्षर पटेलने ३१ धावा केल्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १६० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १५४ धावा करता आल्या.

team-india
IND vs SA: टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा;बावूमा नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com