IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

IIM Mumbai Recruitment 2026: आयआयएम मुंबईमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंंधी तुमच्याकडे आहे. आयआयएममध्ये सध्या नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
IIM Recruitment
IIM RecruitmentSaam Tv
Published On
Summary

IIM मुंबईमध्ये नोकरीची संधी

नॉन टीचिंग स्टाफ पदांसाठी भरती

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयएम मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नॉन टीचिंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयएएस मुंबईमधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. iimmumbai.ac.in या वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

IIM Recruitment
Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

आयआयएम मुंबईमध्ये असोसिएट मॅनेजर, असिस्टंच मॅनेजर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.

पात्रता

असोसिएट मॅनेजर (सिविल/ आयटी/ इलेक्ट्रिकल)- उमेदवारांनी सिविल इंजिनियर / इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत ४-८ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. आयटी किंवा सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी बी.ई/ बीटेक / कॉम्प्टयुटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

असिस्टंट मॅनेजर पदासाठी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावा. याचसोबत ३ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा.

सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी हिंदी विषयात मास्टर्स केलेले असावे. त्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान असायला हवे. उमेदवाराकडे ट्रान्सलेशनचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.

IIM Recruitment
NCERT Recruitment: कोणत्याही परीक्षेशविाय मिळणार NCERT मध्ये नोकरी; पगार १.४४ लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथे एकूण ६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. तुम्ही iimmumbai.ac.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ३० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे.

IIM Recruitment
Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com