Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

Exim Bank Recruitment 2026: एक्झिम बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.
Bank Job
Bank JobSaam TV
Published On

सरकारी बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया एक्झिम बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. इंडिया एक्झिम बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करा. ही भरती आयबीपीएसद्वारे राबवली जात आहे. या नोकरीसाठी तुम्ही ibpsreg.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

Bank Job
Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती; २८,७४० पदे भरली जाणार; पात्रता फक्त १०वी पास

इंडिया एक्झिम बँकेतील या नोकरीसाठी तुम्ही १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.

इंडिया एक्झिम बँकेत डेप्युटी मॅनेजर (बँकिंग ऑपरेशन्स) पदासाठी भरती होणार आहे. या भरती मोहिमेत २० पदे भरली जाणार आहे. अर्जप्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी २१ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

पगार

इंडिया एक्झिम बँकेतील भरती लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४८४८० रुपये ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे.

Bank Job
Indian Oil Jobs: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

पात्रता

बँक डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत (MBA/PGDBA/PGDBM/MMS) फायनान्स/ इंटरनॅशनल बिझनेस/ फॉरेन ट्रेडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. चार्टर्ड अकाउंटंट असणारे उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. पोस्ट ग्रॅज्युएशन २ वर्षांचे केलेले असावे. याचसोबत एक वर्ष कमर्शियल बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, स्टेट लेव्हल इन्स्टिटयूमध्ये काम केलेले असावे.

Bank Job
Indian Oil Job: परीक्षा नाही थेट नोकरी; इंडियन ऑइलमध्ये ३९४ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com