संदीप भोसले
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. या निकालात राज्यातील बहुतांश शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर दहावी परीक्षेतील निकालाचा लातूर पॅटर्नचा डंका कायम राहिला असून ११३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील यंदाचा दहावी परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. मात्र राज्यातील तब्बल २११ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. या २११ पैकी ११३ विद्यार्थी हे एकट्या लातूर विभागातील आहेत.
लातूरचा ९२.७७ टक्के निकाल
लातूरचा निकाल ९२.७७ टक्के इतका लागला आहे. तर विभागातून ११३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. एसएससी बोर्डच्या परीक्षेकरिता लातूर विभागातून १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९७ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील देशिकेंद्र विद्यालयातील ७६५ विद्यार्थ्यांपैकी ७६१ विद्यार्थी हे दहावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी दहा विद्यार्थी हे १०० टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले.
बदलापूर पालिकेच्या सर्व शाळांचा १०० टक्के निकाल
बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेच्या सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बदलापूर नगरपालिकेच्या एकूण १६ शाळा असून या शाळांमधील ९० विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले होते. हे ९० च्या ९० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यातील एरंजाड शाळेतील विद्यार्थिनी वेदिका मेहर ९५.४० टक्के गुण मिळवत पालिकेच्या शाळांमधून पहिली आली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी अभिनंदन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.