10th SSC Result: वाह रे पठ्ठ्यांनो! २८५ विद्यार्थी काठावर पास; कोणत्या विभागात किती विद्यार्थ्यांना ३५ टक्के?

Maharashtra SSC Result 2025:राज्याचा दहावीचा निकाला जाहीर झाला. यंदा २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण तर, २८५ विद्यार्थी काठावर पास झाले असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
SSC Result
SSC ResultSaam
Published On

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात ९४.१० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाल्यानं त्यांच्या घरात अर्थातच आनंदाचं वातावरण असेल, मात्र, २८५ विद्यार्थ्यांची राज्यात आणि सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. चर्चा होण्यामागचं कारणही वेगळं आणि हटके आहे. राज्यातील २८५ पठ्ठ्यांनी काठावर पास होत नवा विक्रम रचला आहे.

राज्यातील महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाला. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ११ वाजता पत्रकार परिषद घेत राज्यातील दहावीचा निकाल जाहीर केला. २०२४-२५ वर्षाचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे.

यातील २११ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर, राज्यातील २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजेच २८५ विद्यार्थी काठावर पास झाल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

SSC Result
10th SSC Result: दहावीचा निकाल जाहीर! नागपूर तळाशी, कोकणने परंपरा राखली; पाहा कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल लागला

एकूण २८५ विद्यार्थी काठावर पास

पुणे: ५९

नागपूर: ६३

छत्रपती संभाजीनगर: २८

मुंबई: ६७

कोल्हापूर: १३

अमरावती: २८

नाशिक: ९

लातूर: १८

कोकण: ०

SSC Result
Mumbai Marathi School: मुंबईत १० वर्षात १०० मराठी शाळा बंद; मराठी भाषा जगणार कशी?

राज्यात फेब्रुवारी - मार्च २०२५ ला दहावीची परीक्षा पार पडली. यंदा राज्यात ९४. १० टक्के निकाल लागला असून, यंदा कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा ९८.८२ टक्के निकाल लागला, तर नागपूर विभागाचा सर्वाधिक कमी ९०.७८ टक्के लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com