

पुणे-
शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानावर हिंदुत्ववादी संघटनेचा आक्षेप.
पुण्यातील साळवे गार्डन या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात केला गोंधळ..
पुण्यातील साळवे गार्डन या ठिकाणी असलेला कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनेने बंद पाडण्याचा प्रयत्न..
हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक..
पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले..
पुणे -
अजित पवारांच्या अपघाता दिवशीचे मुंबई येथील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप
बारामतीच्या नितीन यादव यांनी केला होता आरटीआय अर्ज
केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने मागवलेली माहिती नाकारल्याचा यादव यांचा आरोप
28 जानेवारी सकाळी सहा ते नऊ दरम्यान चे अजित पवार यांच्या सीसीटीव्हीची करण्यात आली होती मागणी
अजित पवार यांच्या सीसीटीव्ही फुटेज ची माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आली होती
पुणे -
अजित पवार विमान अपघाताच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी
अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार
डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या झाला डाउनलोड
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)ला उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती
शिवजयंती निमित्त अलिबाग शहरात संध्याकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
मावळा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भगवे झेंडे, भगवे फेटे ढोल ताशांचा निनाद आणि शिवरायांचा जयजयकार यामुळे वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीची सांगता झाली.
चाळीसगाव शहरातील शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी आणि शिवप्रेमींमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्याची घटना समोर आली.
घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
पुण्यात भैरोबा नाला,चिमटा वस्ती येथे आज दुपारी दोन घरांमध्ये आग लागली असता पुणे महापालिका व पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाकडून तीन वाहने व सुमारे वीस जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत घराचे पुर्ण नुकसान झाले असून चार घरगुती सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने व आग वस्तीत इतरञ पसरु न दिल्याने मोठा धोका टळला. जखमी कोणी नाही...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुरेत्रा पवारच होतील. 26 फेब्रुवारीला या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आहे. आणि या बैठकीतच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.
यवतमाळच्या आर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुकळी गावाजवळ दशमेश पंजाबी धाब्यावर हिरोइनसह काॅफीस्ट्रा असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ गुन्हे शाखेला मिळाली. या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेने धाब्यावर छापा टाकून हिरोईन 18 ग्राम किंमत एक लाख 80 हजार रुपये कॉपीस्ट्रा 27 किलो किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये असा एकूण तीन लाख पंधरा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणातील एका संशोधक-कलावंताने अनोखी कलाकृती साकारली आहे. ४२२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावांतून शिवछत्रपतींचे प्रभावी पोर्ट्रेट उभे करण्यात आले असून इतिहास, कला आणि संशोधनाचा अद्वितीय संगम घडवण्यात आला आहे. या प्रेरणादायी कलाकृतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री सावकारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्श संपूर्ण जग घेत असल्याचे सांगितले.अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्थापन केलेले स्वराज्य आणि सर्व समाजघटकांना दिलेला सन्मान हा आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भुसावळ शहरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
बुलढाणा आगारातून काल सायंकाळी अकोला कडे निघालेल्या एमएच ४० एन ९९२७ क्रमांकाच्या एसटी बसने प्रवाशांना धक्काच् दिला.. या बसमधील प्रवाशी सीटच गायब असल्याचे दिसले .. दरम्यान त्याठिकाणी फक्त धातूची फ्रेम दिसली, बसण्यासाठी काहीच नव्हते.. याचा व्हिडिओ एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला असून विद्यार्थी, वृद्ध, महिलांसाठी सवलती देताना ई- बसेस आणणाऱ्या महामंडळाची दयनीय अवस्था झाल्याचे म्हणावे लागेल... एवढेच नव्हे तर एस टी महामंडळाच्या अनेक बस अशा आहे की ज्या भागात अवस्थेत आहेत, त्या रस्त्यात कुठेही बंद पडतात, आणि त्यामुळे प्रवाशांना नाहकचा त्रास सहन करावा लागतो ..एस टी. महामंडळाने अशा बसची तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी प्रवासांच्या वतीने करण्यात येत आहे .
छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची झाली.
महाराणा प्रताप शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते याचवेळी एका शुल्लक कारणावरून हा वाद झाला.
काही काळासाठी परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवाळला
आता शांतता आहे
नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.यात सर्वाधिक 27 ग्रामपंचायती शहादा तालुक्यातील, तर नंदुरबारमधील 22, अक्राणी 16, नवापूर 14, तळोदा 7 आणि अक्कलकुवा येथील एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. प्रभाग रचनेसाठी गुगल अर्थच्या नकाशांचा वापर केला जाणार असून, 20 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 7 एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून 13 एप्रिलपर्यंत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या जातील. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाल्यानंतर, 4 मे 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. या घोषणेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीवर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ आणि धावपळ उडाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीची तयारी सुरू असताना परिसरातील झाडावर असलेले मधमाशांचे पोळे हलले. पोळे हलताच मधमाशा आक्रमक झाल्या आणि जवळ उभ्या असलेल्या काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर त्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पळत सुटले. या घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धूर (स्मोक बॉम्ब) सोडण्यात आला. मात्र धुरामुळे मधमाशा अधिकच पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख हे देखील उपस्थित होते. त्यांनी आणि इतरांनी वेळेत सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव केला. नंतर परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावातील चंद्रभागा नदी पात्रात हत्तीवर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा सकारला आहे.
येथील प्रवीण नगरे आणि सुरज नगरे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांची तरंगती प्रतिकृती साकारली आहे.
नंदुरबारच्या आदिवासी संस्कृतीला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान तोरणमाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी कला, परंपरा आणि हस्तकलेचे जतन करून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे तोरणमाळचे नाव देशाच्या पर्यटन नकाशावर झळकेल. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येण्याचा अंदाज आहे. दरवर्षी हा महोत्सव साजरा करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात मार्च महिन्यात शिवरायांच्या पुतळा विटंबनेची घटना घडली होती.. एक वर्ष होत आले तरीही पोलीसांनी अजून आरोपीला अटक केली नाही याचा निषेध करत आज सर्वपक्षीय शिवप्रेमींनी शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी न करता थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर शिवजयंती साजरी करत प्रशासनाचा निषेध केलाय.
ईश्वरपूर ताकारी रस्त्यावर साखराळे येथील पेट्रोल पंपानजीक भरधाव कारने दुचाकी, पादचाऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत. नितीन शिवाजी पवार (वय ४१ रा. निनाईनगर, ईश्वरपूर), त्यांची आई छाया पवार हे जखमी झाले. तिसऱ्या जखमी व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्यांना कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. कार चालक लिमय करसे (रा. गडचिरोली) याच्या विरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी नितीन व त्यांची आई हे दुचाकी (एमएच. १०, ए. के. १६३०) वरून शेताकडे निघाले होते. ते रस्त्याकडेला थांबले होते. त्यावेळी ताकारी कडून आलेल्या कार (एमएच १२, झेडसी १७४६) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर चालत निघालेल्या एकाला धडक दिली.
देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाय अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दिली आहे. महाडच्या छबिना उत्सवादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. वीरेश्वर महाराजांना भक्तांनी, कार्यकर्त्यांनी साकड घातल्याच गोगावले म्हणाले आहेत. गेली पाच वर्ष पालक मंत्री पद हुलकावणी दाखवत असताना देखील गोगावले यांच्या आशावादीपणामुळे एकच हशा पिकला.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुणे लेन ला वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या लेंन वर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहतुकीच्या रांगा
किलोमीटर 41 दत्तवाडी येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा टनल येथे पंधरा मिनिटांचा महामार्ग पोलिसांचा ब्लॉक
देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आज पुणे लेनवर असणार वाहतूक कोंडी
शेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आलं आहे. पेंटर रवी इंगले यांनी एका इमारतीवर तब्बल ५५ फूट उंचीचं भव्य पेंटिंग साकारलं असून ते शहरवासीयांचं आकर्षण ठरत आहे.
या कलाकृतीमुळे परिसरात शिवभक्तीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून पेंटिंगचं कौतुक होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात ही कलाकृती चर्चेचा विषय ठरली आहे.
आज राज्यात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जात आहे अशाच पद्धतीने आगळीवेगळी शिवजयंती भाजपच्या वतीने अरबी समुद्रामध्ये साजरी करण्यात आली. ढोल ताशा गजरामध्ये पताकामध्ये फडकत शिवजयंती बोटीं मधून अरबी समुद्रामध्ये साजरी करण्यात आले
लहानग्यांच्या बोबड्या बोलात आणि निरागस हसण्यातून साकारलेला हा क्षण पाहून उपस्थितांचं मन भारावलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आणि संस्कारांची प्रेरणा घेणारी ही चिमुकली पिढी, बालशिवबाच्या वेशात केवळ सुंदर दिसत नाही तर त्यातून आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचा संदेशही देताना दिसली. शिवनेरीवरून उमटलेला हा बालशिवबाचा जयघोष पाहून संपूर्ण परिसर आनंदात न्हाऊन निघाला.
शिव जयंती निमित्ताने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड पोलिस दला मार्फत मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस दलाच्या वाद्यवृंदाने स्पुर्तीगीत वाजवत शिवरायांना मानवंदना वाहिली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी देखील उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुमसर येथील राजमुद्रा ग्रुप तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरातून महिल्यांनी नऊवारी साडी परिधान करीत चक्क शहरातून बुलेटने बाईक रॅली काढत जयघोष केले आहे. ही बाइक रैली सर्वांचा आकर्षणाचा केंद्र ठरली
वाशिममध्ये बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल
भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान 581 विद्यार्थ्यांचा सामुदायिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता
शिवजयंतीचे औचित्य साधून नंदुरबारचे कलाकार गौरव माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक अनोखी रांगोळी साकारली आहे.396 व्या जयंतीनिमित्त साकारलेली ही कलाकृती सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या रांगोळीचे वैशिष्ट्य असे की, दृष्टीभ्रम तंत्राचा वापर केल्यामुळे ती कोणत्याही बाजूने पाहिली तरी शिवरायांचा चेहरा स्पष्टपणे दिसून येतो. रंगांचा अचूक संगम आणि सूक्ष्म बारकाव्यांमुळे ही प्रतिमा जिवंत भासते. महाराजांच्या शौर्याला कलेच्या माध्यमातून दिलेली ही आगळीवेगळी मानवंदना पाहून नंदुरबारकर भारावून गेले आहेत. सोशल मीडियावरही या रांगोळीचे प्रचंड कौतुक होत आहे..
दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड
गेल्या १५ मिनिटांपासून गुंदवली स्थानकांत मेट्रो रखडली
प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम लागणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती
खंड पडलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम लागणार
दोन्ही बाजूने स्वतःच्या पक्ष वाढवण्याबाबत पुढील रणनीती ठरवल्या जाणार
पक्षाच्या धोरणांबाबत पुढील भूमिका ठरवल्या जाणार
सुनेत्रा वाहिनी दुःखात असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही टीका टिप्पणी करू नका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना
मेरिट बेसिस वर तसेच काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार
गोरेगाव (पूर्व) येथील आरे मिल्क कॉलनीतील छोटा काश्मीर परिसरात ओला कार आणि बेस्ट बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ओला कार चालक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पुढील तपास सुरू आहे.
रयतेचे राजे शिव छत्रपती महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्यात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. हिंदवी प्रतिष्ठान आणि शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं भंडाऱ्यात ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झालेत. या चिमुकल्यांनी शिवरायांच्या विविधारंगी आकर्षक अशा प्रतिमा साकारल्यात. चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद या चित्रकला स्पर्धेदरम्यान बघायला मिळाला.
संपूर्ण राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते... थोड्याच वेळात कोल्हापुरातील शिवाजी मंदिर या ठिकाणी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते शिवजन्म काळ सोहळा साजरा केला जातोय.... या शिवजन्म काळ सोहळ्यासाठी शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात...शाही लावाजण्यासह छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिव मंदिरात पोहोचते.. आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या हस्ते पाळणा म्हटल्यानंतर शिवजन्म काळ सोहळा पार पडतो...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बीडच्या साक्षाळ पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यात रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आले होते यावेळी 51 शिवभक्तांनी रक्तदान करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला कार्यक्रमास जेष्ठ नागरिक शिवप्रेमी उपस्थित होते.
देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे तिकडे हिंगोली मध्ये सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिवजयंतीचा उत्साह मोठ्या थाटात साजरा केला आहे, या विद्यार्थ्यांनी आहे.बाल शिवबा' या संकल्पनेवर आधारित अत्यंत देखणी आणि जिवंत रांगोळी साकारली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, त्यांचे तेज आणि जिद्द या रांगोळीच्या माध्यमातून अगदी हुबेहूब उतरली आहे विद्यार्थ्यांनी रांगोळीतून साकारलेला शिवबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती
शौर्य, स्वराज्य आणि संस्कारांची अखंड ज्योत पेटवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत, डोणजे (ता. हवेली) येथील श्रुती चांगदेव तळोदे या मुलीने आज किल्ले सिंहगड आणि घाट रस्त्याने तीचे रांगोळी कलेच्या माध्यमातून शिवरायांना अनोखी आदरांजली अर्पण केली. विविध रंगांच्या रांगोळीच्या भरभरून आणलेल्या पिशव्या, हातात रंग आणि साहित्य मनात इतिहासाविषयी अभिमान आणि अंतःकरणात स्वराज्याची प्रेरणा घेऊन राबविण्यात आलेला हा उपक्रम पाहणाऱ्यांच्या मनात आपोआपच प्रकाश टाकणारा ठरला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आशिष शेलार शिवनेरीवर दाखल
यापुर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल झालेत
काहीच वेळात शिवजन्मोत्सवाला सुरुवात होईल
शिवजन्म खोलीत शिवपुजन होऊन पाच महिलांच्या उपस्थित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत पाळणा गायण होईल
शिवनेरी गडावर शासकीय मानवंदना दिली जाणार
त्यानंतर सैन्य दलाकडुन सलामी
आदीवासी बांधवांचा मर्दाणी खेळाची प्रातिक्षीके सादर होतील
हा सोहळा शिव भक्तांच्या उपस्थित साजरा होतोय शिवनेरी गडावर एक वेगळा उत्साहात साजरा होतोय
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी
खंडाळा बोगद्याआधी वाहतूक कोंडी
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बोगदाजवळ वाहतूक कोंडी त्याचबरोबर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल
शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला लावणार हजेरी
राजमाता जिजाऊ यांचे माहेर आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते, आज विविध कार्यक्रमाचे जिल्हाभर आयोजन असणार आहे, तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा आणि स्मारकावर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली होती...
नागपूर महानगरपालिकाची विशेष सभा २४ फेब्रुवारी रोजी
सभेत स्थायी समिती, परिवहन समिती विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार.
विशेष सभेपूर्वी भाजप नेत्यांकडून सभापतींच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.
६ फेब्रुवारीच्या सभेत प्रलंबित ठेवलेला स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय पुन्हा अजेंड्यावर.
स्थायी समिती आर्थिक व प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जाते.
परिवहन समिती निवडीकडेही लक्ष सभापतिपदासाठी रस्सीखेच.
नांदेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह पाहावयास मिळत आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नांदेड शहरात मशाल रॅली काढून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड, यांच्यावतीने या मशाल रॅलीचा आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीत मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.
पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगरपालिकेची मोठी कारवाई
अवैध रीतीने केलेल्या अतिक्रमणावर पुणे महापालिकेने चालवला हातोडा
खराडी, बाणेर, सुस , हडपसर या भागातील अनधिकृत बांधकाम महापालिकेने केले जमीनदोस्त
काल एकाच दिवसात तब्बल ३० हजार चौरस फूट आणि विकृत कच्चा हो पक्या बांधकामांवर महापालिकेचा हातोडा
पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द
नगरसेवकांनी महापालिकेत प्रस्ताव फेटाळला
नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांचे टोचले कान
पुणे महापालिका प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली मिळकतकातील पाच टक्के वाढ आज सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमेकांनी फेटाळून लावली
प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी करवाढ करण्यापेक्षा नागरिकांना चांगली वागणूक द्यावी त्यांचे कामे वेळेत केली तर उत्पन्न वाढेल अशा शब्दात नगरसेवकांनी प्रशासनाचे कान टोचले
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज सादर
भाजपकडून श्रीनाथ भिमाले, तर राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरेंनी भरला अर्ज
येत्या सोमवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी सकाळी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी श्रीनाथ भिमाले यांचे नाव निश्चित केल्याचे पत्र सभागृह नेते गणेश बिडकर यांना पाठवलं
शहरातील दूषित पाणीपुरवठा बाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दूषित पाण्याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते
घरात विविध ठिकाणी दूषित आणि अपूर्ण पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकाने आक्रमक भूमिका घेतली
क्षेत्रीय कार्यालय निहाय पाणीपुरवठा बाबत नगरसेवकाबरोबर अधिकाऱ्याने बैठक घेण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपूरे यांनी दिले
उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार
राज्यात 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी
८ लाख ६५ हजार ७४० मुलगे ७ लाख ४२ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार
राज्यातील पाच हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. अशी माहिती बोर्डाने दिली आहे
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण यांना विभागात ही परीक्षा होत आहे
छत्रपती शिवजयंती निमित्त आज निघणाऱ्या शोभायात्रेमुळे वाहतुकीत बदल
मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे
शिवाजी रस्त्याने स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहन चालकाने जंगली महाराज रस्ता सर्व बर्वे चौक टिळक रस्त्याने पर्यायी मार्ग दिला आहे
गणेश रस्ता जिजामाता चौक वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे दारूवाला पूल मार्गाने नागरिकांनी जावे
केळकर रस्त्यावरील आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक ओळखण्यात आली आहे लक्ष्मी रस्त्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य आणि नेत्रदीपक सोहळ्याला सुरवात
नागपुरातील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच जल्लोषात आणि तरुणांच्या गर्दीत उत्सवाला सुरुवात...
जय भवानी… जय शिवाजी… या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
पहाटे पाच वाजता पारंपरिक ध्वज, शंखनाद आणि महिला मुद्रा पथकाच्या दिमाखात पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. महालातील टिळक पुतळा येथील श्री गणेश मंदिरापासून निघालेली पालखी शिवतीर्थावर दाखल होताच उपस्थित शिवभक्तांनी जल्लोषात स्वागत केले.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय यासाठी शिवभक्त राज्यभरातील गावागावातुन सायकल रँली सह पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर निघालेत.. हर हर महादेव...! छत्रपती शिवाजी महाराज कि जय...! या घोषणांनी परिसर दणाणुन गेलाय मागच्या दोन दिवसांपासुन राज्यभरातून शिवज्योत किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहे .या सोहळ्यात उर्जा मिळत असल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे
लातूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पाळणा उत्साहात पार पडला, मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हा देखना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच ऐतिहासिक पोवाडे, यांच देखील विशेष आयोजन करण्यात आलं , तर फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाईने चौकात शिवमय वातावरण पाहायला मिळालं, दरम्यान आज दिवसभर शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त एक भव्य आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळालाय. अकोटमधील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ही भव्य रांगोळी साकारलीये. तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटांमध्ये रांगोळी काढण्यात आलीय. यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा साकारण्यात आलीये… विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती उभी केलीये. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ही भव्य रांगोळी साकारली गेलीय. या रांगोळीसाठी तब्बल 40 क्विंटल रंग वापरण्यात आलाय. सर्वप्रथम मैदानाची आखणी करून प्रतिमेचे रेखाटन करण्यात आलेय. त्यानंतर रंग भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून महाविद्यालयात शिवजयंती साजरी केली जातेय. एवढ्या मोठ्या आकाराची रांगोळी काढण्याचे हे सलग तिसरे वर्ष ठरलेय. ही कलाकृती साकारण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी आठ दिवस अथक मेहनत घेतली. या भव्य उपक्रमामुळे आकोट शहरात शिवाजी महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होतोये.
अकोल्यात ट्युशन एरियात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलीय. मोठ्या प्रमाणात ट्युशन क्लासेस असलेल्या शहरातील न्यु तोष्णीवाल लेआऊट भागात पोलिसांनी आरोपीची धिंड काढलीय. रस्त्यावर पायी चालणाऱ्या शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आज अखेर 2 दिवसानंतर अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्याये. छेडखानीचा प्रकार संपूर्ण CCTVमध्ये कैद झाला होता.. विवेक उर्फ विकी खांडेकर असं या मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीचे नाव आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.