Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

viral video of bus fire: केरळमध्ये धावत्या बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अडकलेल्या प्रवाशांना एका डिलिव्हरी एजंटने दरवाजा तोडून बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
viral video of bus fire
viral video of bus firesaam tv
Published On

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही व्हिडीओ हे काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये पाहता पाहता एका खासगी बसला आग लागल्याचं दिसतंय.

केरळमधील ओट्टापालममध्ये धावत्या बसला आग लागलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेत एका ऑनलाइन डिलिव्हरी एजंटने धाडस दाखवत बसचा अडकलेला दरवाजा तोडून प्रवाशांचे प्राण वाचवलेत. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, पलक्कड–गुरुवायूर मार्गावर धावणाऱ्या बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच धुराचं रूप आगीच्या ज्वाळांमध्ये बदललं. प्रसंगावधान राखून चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र पुढील ऑटोमॅटिक दरवाजा न उघडल्याने काही प्रवासी बसमध्ये अडकले होते.

viral video of bus fire
Video Viral: दारूच्या नशेत थेट रेल्वे रूळावर झोपला; समोरून अचानक ट्रेन आली आणि...! मुंबईतील स्टेशनवरील घटनेचा Video Viral

आग लागलेल्या बसचा मागील दरवाजा उघडल्यामुळे काही जणांना बाहेर पडणं शक्य झालं. परंतु पुढील भागात अडकलेल्या प्रवाशांसाठी परिस्थिती धोकादायक दिसत होती. याच वेळी त्या रस्त्यातून जात असलेल्या एका डिलिव्हरी एजंटने धाडस दाखवत बसकडे धाव घेतली.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तरुण पुढील दरवाजावर जोरदार लाथ मारून दरवाजा तोडताना दिसतोय. दरवाजा उघडल्यानंतर अडकलेले प्रवासी तात्काळ बाहेर पडताना पाहायला मिळतंय.

viral video of bus fire
Shocking Accident : हायवेवर कंटेनर 'यम' बनून आला अन् उलटला, कारचा चेंदामेंदा; CCTV व्हिडिओ शॉक बसेल

दरम्यान, जवळील बसस्थानकावर उपस्थित ऑटोचालक आणि काही लोकांनी तत्परता दाखवत अग्निशमन दलाला पाचारण केलं. यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, बसच्या डिझेल पाइपमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी.

viral video of bus fire
VIDEO: चिमुकल्याच्या कानात तीव्र वेदना, पालकही गोंधळले...; मशीनने तपासल्यावर डॉक्टरही झाले शॉक!

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी डिलीव्हरी बॉयचं कौतुक केलंय. एका युजरने म्हटलंय, 'योग्य वेळी दाखवलेलं धाडस अनेकांचे प्राण वाचवू शकतं' तर दुसऱ्याने लिहिलंय की, असे प्रकार घडू नयेत म्हणून दक्षता घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com