Pro Kabaddi League: घरच्या मैदानावर यु मुंबाची विजयी सलामी! बेंगळुरू बुल्सचा ५ गुणांनी पराभव

U Mumba vs Bengaluru Bulls: प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील मुंबई लेगच्या सामन्यांना प्रारंभ झाला आहे. मुंबई लेगच्या पहिल्याच सामन्यात यु मुंबाने बेंगळुरू बुल्सवर ४०-३५ ने विजय मिळवला आहे.
pkl 2023
pkl 2023saam tv news
Published On

Pro Kabaddi League Season 10, U Mumba vs Bengaluru Bulls:

प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील मुंबई लेगच्या सामन्यांना प्रारंभ झाला आहे. मुंबई लेगच्या पहिल्याच सामन्यात यु मुंबाने बेंगळुरू बुल्सवर ४०-३५ ने विजय मिळवला आहे.

NSCI स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत यु मुंबाच्या पदार्पणात बिटूने सहा पकडी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

घरच्या मैदानावरील चाहत्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रेरणा मिळालेल्या यु मुंबा संघाने बेंगळुरू संघावर सातव्या मिनिटाला पहिला लोन चढवला आणि ११-३ अशी आघाडी घेतली..

बेंगळुरू बुल्स संघाला त्यानंतर संपूर्ण सामन्यात दडपणाखालीच खेळावे लागले. बेंगळुरू संघाने पहिली पकड तब्बल अकराव्या मिनिटाला केली. तर, बेंगळूरुचा मुख्य आक्रमक भारत ला आज सुर गवसला नाही. विकास कंडोलाने अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे बेंगळुरू बुल्सला मुंबावर पाहिलं लोन चढवाता आला तरी यु मुंबा संघाकडे १९-१० अशी आघाडी राहिली.

उत्तरार्धात मुंबा संघाने आपली आघाडी वाढवत नेली. बेंगळुरूचे केवळ दोन खेळाडू मैदानात राहिले असताना सुशीलने सलग सहा गुण मिळवताना त्यांना पुनरागमनाची संधी दिली. मात्र यु मुंबा संघाने बेंगळुरू संघावर दुसरा लोन चढवताना २८-१८अशी आघाडी घेतली. तेव्हा १२ मिनिटे बाकी होती. (Latest sports updates)

pkl 2023
IND vs SA 2nd Test: मन जिंकलस भावा! सिराज कौतुक करत असताना बुमराहने जे केलं ते पाहुन अभिमानच वाटेल; Video

सामन्यावर पकड मिळवलेल्या यु मुंबा संघाने त्यानंतर उरलेल्या वेळात राखीव खेळाडूंना संधी दिली. रिंकूच्या जागी मैदानात आलेल्या बिटूने भारतची पकड करताना आपली पाचवी पकड केली. याचवेळी अनुभवी सुरजीत सिंगने सुपर रेड करत यु मुंबाचे तीन खेळाडू बाद करताना जोरदार झुंज दिली.

pkl 2023
PKL Season 10: पटनाचा डिफेन्स गडबडला,दिल्लीचे रेडर्स चमकले! अटीतटीच्या लढतीत दबंग दिल्लीचा पटना पायरेटसवर संघर्षपूर्ण विजय

पाठोपाठ सचिन नरवालने दुसरी सुपर रेड केल्यामुळे यु मुंबाचे दोनच खेळाडू मैदानात राहिले. अखेरच्या मिनिटाला बेंगळूरु बुल्स संघाने यु मुंबाचे सर्व गडी बाद करत लोन चढविला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि यु मुंबा संघाला मोसमातील पाचवा विजय नोंदवता आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com