Mirabai Cahnu Reaction After Lost Medal Saam Tv
क्रीडा

Mirabai Chanu: मासिक पाळी असताना १११ किलो वजन उचललं, मीराबाई चानूने सांगितले पदक न जिंकण्यामागचे कारण!

Mirabai Cahnu Reaction After Lost Medal: मीराबाई चानू महिलांच्या ४९ किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर राहिली. पदक न जिंकल्याची खंत मीराबाईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि ती खूपच भावुक झाली.

Priya More

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही. पदक जिंकता न आल्याची खंत मीराबाई चानूला आहे. मीराबाई चानू महिलांच्या ४९ किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर राहिली. तिला पदक जिंकता आले नाही. पदक न जिंकल्याची खंत मीराबाईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि ती खूपच भावुक झाली.

पदक जिंकण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. पण तिला यश आले नाही. मीराबाई चानूने मात्र तिच्या कामगिरीवर समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. मीराबाई चानूने सांगितले की, 'मासिक पाळीचा तिसरा दिवस होता त्यामुळे मला थोडं अशक्त वाटत होते.' रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार मीराबाई चानूने इव्हेंटनंतर प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, 'माझ्या मासिक पाळीचा तिसरा दिवस होता. मला अशक्त वाटत होते. यामुळे माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. मी माझे सर्वोत्तम दिले. पण तो माझा दिवस नव्हता.'

मीराबाईने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो असे एकूण १९९ किलो वजन उचलले. यामुळे तिचे पदक अवघ्या एक किलोने हुकले. यावर मीराबाईने सांगितले की, 'मी माझ्या कामगिरीवर खूश आहे कारण दुखापतीतून सावरल्यानंतर तयारीसाठी माझ्याकडे खूपच कमी वेळ होता.' तिने पुढे सांगितले की, 'मी सरावात ८५ किलो वजन उचलत होते आणि या स्पर्धेतही मी तेच केले. क्लीन अँड जर्कमध्येही चांगली कामगिरी करण्याचा मला विश्वास होता. सर्व काही ठीक चालले होते आणि मी प्रशिक्षकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन केले. आज नशीब माझ्यासोबत नव्हते की मी पदक जिंकू शकले नाही पण मी माझी सर्वोत्तम कामगिरी केली.'

दरम्यान, सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या चीनची सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन होउ झिहुईने क्लीन अँड जर्कमध्ये ऑलिम्पिक रेकॉर्डसह पहिले स्थान मिळविले. तिने एकूण 206 किलो (स्नॅच ८९, क्लीन आणि जर्क ११७) उचलले. रोमानियाची व्हॅलेंटिना कॅम्बेई २०६ (९३ आणि ११२) किलो वजनासह रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरली आणि थायलंडच्या सुरोदचना खाम्बोने २०० (८८ आणि ११२) किलो वजनासह कांस्य पदक जिंकण्यात यश मिळविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT