Paris Olympics 2024: भारताने तासाभरात 2 पदकं गमावली! मध्यरात्री पॅरिसमध्ये काय घडलं?

Mirabai chanu and Avinash Sable Events Update: भारतीय फॅन्ससाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. मीराबाई चानू आणि अविनाश साबळे यांना पदक जिंकता आलेलं नाही.
Paris Olympics 2024: भारताने तासाभरात 2 पदकं गमावली! मध्यरात्री पॅरिसमध्ये काय घडलं?
mirabai chanu and avinash sabletwitter
Published On

भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील १२ वा दिवस हा हार्टब्रेकच म्हणावा लागेल. विनेश फोगाटने (vinesh phogat) ५० किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र १०० ग्रॅम वजन अधिक असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. याहून वाईट आणखी काय असू शकतं. दिवसाची सुरुवात वाईट झाल्यानंतर दिवसाचा शेवट गोड होईल असं वाटलं होतं. मात्र दिवसाच्या शेवटीही भारतीय फॅन्सला निराश करणारी बातमी समोर आली आहे.

भारतीय फॅन्स रात्री गाढ झोपेत असताना पॅरिसमध्ये मीराबाई चानू आणि अविनाश साबळे यांचा मेडलसाठी सामना रंगला. मात्र दोघांनाही रिकाम्या हाती परतावं लागलं आहे.

मीराबाई चानूचा पराभव

मीराबाई चानू स्नॅच प्रकारात ८८ किलो वजन उलचून तिसऱ्या स्थानी राहिली. तर क्लीन अँड जर्क मध्ये मीराबाई चानूला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. मीराबाईने पहिल्या प्रयत्नात १११ किलो भार उचलण्याचा प्रयत्न केला. तिने खांद्यापर्यंत भार घेतला. मात्र हा भार तिला डोक्यावर घेऊन जाता आला नाही. मात्र पुढील प्रयत्नात तिने १११ किलो भार उचलून १९९ किलो वजनासह तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

Paris Olympics 2024: भारताने तासाभरात 2 पदकं गमावली! मध्यरात्री पॅरिसमध्ये काय घडलं?
Paris Olympics: विनेशचं वजन वाढलं की वाढवलं? विनेशसोबत कुणी केला वजनाचा 'खेळ'?

तर थायलंडची वेटलिफ्टर खाम्बाओने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ११२ किलो वजन उचलून २०० किलो वाजासह दुसऱ्या स्थानी दावा ठोकला. तर कॅम्बेइने ११२ किलो वजन यशस्वीरीत्या उलून २०५ किलो वजनासह सुवर्णपदकासाठी दावा ठोकला.

मीराबाई चानूला (Mirabai chanu) तिसऱ्या प्रयत्नात ११४ किलो भार उचलायचा होता. मात्र ती अपयशी ठरली. त्यामुळे तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

अविनाश साबळेचा पराभव

अविनाश साबळेने (Avinash sable) ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारातील पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवले होते. यासह त्याने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र फायनलमध्ये त्याला पदक जिंकता आलेलं नाही. या शर्यतीला सुरुवात झाली तेव्हापासून ते शेवटपर्यंत तो टॉप ५ मध्ये प्रवेश करूच शकला नाही. दरम्यान शेवटी त्याला ११ व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com