मास्टर ब्लास्टरने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता मीराबाई चानूची घेतली भेट

ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिल्याच दिवशी रौप्य पदक मिळवून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूची खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भेट घेतली आहे.
मास्टर ब्लास्टरने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता मीराबाई चानूची घेतली भेट
मास्टर ब्लास्टरने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता मीराबाई चानूची घेतली भेटtwitter/ @mirabai_chanu
Published On

मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympic 2020) देशाला पहिल्याच दिवशी रौप्य (Silver Medal) पदक मिळवून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूची (Mirabai Chanu) खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भेट घेतली आहे. सचिनच्या मुंबईतील राहत्या घरी या दोघांची भेट झाली. सचिननं स्वतः ट्विट करत या भेटीचे फोटोज् शेअर केले आहेत. या भेटीमुळे दोघांनीही आनंद व्यक्त केला आहे. (sachin tendulkar meets olympic weightlifter mirabai chanu)

हे देखील पहा -

मीराबाई चानूने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ''आज सकाळी सचिन तेंडुलकर सरांना भेटुन खुप आनंद झाला. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या प्रेरणेचे शब्द नेहमीच माझ्या सोबत राहतील. प्रत्यक्षात त्यांनी मला खुप प्रेरित केलं.'' मीराबाईच्या या ट्विटला सचिन तेंडुलकरने रिट्विट करत लिहीलं की ''मीराबाई चानू तुम्हाला भेटुन खुप आनंद झाला. मणिपुर ते टोक्यो पर्यंतच्या तुमच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल तुमच्याशी बोलुन छान वाटलं. येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला यश मिळो, कठोर परिश्रम करत रहा'' सचिनच्या या ट्विटनंतर मीराबाई चानूने सचिनचे धन्यवाद मानले आहेत.

मास्टर ब्लास्टरने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता मीराबाई चानूची घेतली भेट
ICC Test Rankings: बुमराहची उडी तर कोहलीची घसरण; वाचा सर्व यादी

मीराबाई चानूने महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये भारताचे नेतृत्व केले होते. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक होते. मीराबाई चानूने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले होते आणि रौप्य पदावर नाव कोरले. त्यानंतर पंतप्रधानांसह देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com