भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात नॉटिंगहॅममध्ये चालू असणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (5 Match Test Series) पहिल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) जबरदस्त उडी मारली आहे, तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आपले स्थान कायम ठेवले आहे. बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत (ICC Test Rankings) पुन्हा पहिल्या 10 मध्ये प्रवेश मिळवला आहे.
कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने 10 स्थानांची झेप घेत 19 व्या स्थानावरून 9 वे स्थान मिळवले आहे. बुमराह या सामन्यापूर्वी 683 गुणांसह पहिल्या 20 मध्ये होता, परंतु या सामन्यानंतर त्याचे गुण 760 वर गेले आहेत आणि त्याने पुन्हा पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. त्याचवेळी, गोल्डन डकचा शिकार बनलेला विराट कोहली चौथ्यावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. चौथे स्थान इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने घेतले आहे, त्याने पहिल्या कसोटीत भारताविरुद्ध अर्धशतक आणि शतक झळकावले होते.
आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप 10 च्या यादीत रूट आणि विराट वर आणि खाली सरकले आहेत बाकी क्रमवारीत काही बदल झालेला नाही. तर गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसनला एक स्थानाचा फायदा तर स्टुअर्ट ब्रॉडच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. अँडरसन सध्या 7 व्या क्रमांकावर आहे, तर ब्रॉड 8 व्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या टॉप 10 च्या यादीत फक्त एकच बदल झाला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. तर बेन स्टोक्स दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासाठी दुसरी कसोटी महत्त्वाची आहे कारण त्यांची फलंदाजी सध्या कठीण स्थितीतून जात आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल 5 फलंदाज
1. केन विल्यमसन (901 गुण)
2. स्टीव्ह स्मिथ (891 गुण)
3. मार्नस लाबुशॅगन (878 गुण)
4. जो रूट (846 गुण)
5. विराट कोहली (791 गुण)
आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल 5 गोलंदाज
1. पॅट कमिन्स (908 गुण)
2. आर अश्विन (856 गुण)
3. टीम साऊदी (824 गुण)
4. जोश हेझलवूड (816 गुण)
5. नील वॅग्नर (810 गुण)
आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल 5 अष्टपैलू
1. जेसन होल्डर (384 गुण)
2. रवींद्र जडेजा (377 गुण)
3. बेन स्टोक्स (370 गुण)
4. आर अश्विन (351 गुण)
5. शाकिब अल हसन (334 गुण)
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.